पोलीस म्हणतात!... म्हणून वांद्रे येथे परप्रांतीयांची गर्दी जमली होती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:09 PM2020-04-14T20:09:05+5:302020-04-14T20:10:35+5:30
आज ४ वाजताच्या सुमारास जवळपास १५०० परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी एकत्र जमले होते.
मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे वांद्रे येथील परप्रांतीय मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. जवळपास १५०० मजूर रागाच्या भरात वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले होते असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.
आज ४ वाजताच्या सुमारास जवळपास १५०० परप्रांतीय मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांना घरी जाण्याची आतुरता होती. मात्र, लॉकडाऊन वाढल्यानं असंतोष त्यांच्यात उत्पन्न झाला आणि हा उद्रेक झाला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस, डीसीपी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना सौम्य बलाचा वापर करावा लागला. सध्या तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.
Coronavirus: वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव