असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:37 PM2020-06-10T18:37:52+5:302020-06-10T18:48:01+5:30

अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी कोरोनाला पळविण्यासाठी कोडरमा येथे  ४०० बकऱ्यांचा एकत्र बळी दिला आहे.

Whatever the superstition, ranchi sacrifice of 400 goats in koderma in blind faith of removing corona | असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

असला कसला अंधविश्वास, कोरोनाला पळवण्यासाठी दिला चक्क ४०० बकऱ्यांचा बळी

Next
ठळक मुद्देकोडरमा जिल्ह्यातील चांदवारा ब्लॉक अंतर्गत उरवण या गावी असलेल्या देवी मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली बुधवारी सकाळपासूनच अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता.कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देवीच्या मंदिरात हवन, पूजन, आरती सुरु आहे. स्त्रिया भक्तीगीते गात आहेत.

झारखंडसह संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहेत. एकीकडे लोक कोरोनामुले मृत्यूमुखी पडत आहेत, तर दुसरीकडे या कोरोनाच्या संसर्गातून बरे देखील होत आहेत. कोरोनाला पळवून लावण्यासाठी लोकांमध्ये वेगवेगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धा देखील निर्माण झाली आहेत. लोक कुठे अंधश्रद्धेत पूजा - आर्चा करीत आहेत आणि कुठे बळी देत आहेत. कोरोनासारख्या महामारीचा प्रतिबंध फक्त उपचारातून केला जाऊ शकतो. यासाठी मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी कोरोनाला पळविण्यासाठी कोडरमा येथे  ४०० बकऱ्यांचा एकत्र बळी दिला आहे.



कोडरमा जिल्ह्यातील चांदवारा ब्लॉक अंतर्गत उरवण या गावी असलेल्या देवी मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली बुधवारी सकाळपासूनच अंधश्रद्धेचा खेळ सुरु होता. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देवीच्या मंदिरात हवन, पूजन, आरती सुरु आहे. स्त्रिया भक्तीगीते गात आहेत. देवीला संतुष्ट करण्यासाठी निष्पापांचा बळी दिला नाही असं कसं होऊ शकतं. याची सुरुवात कोंबड्याची बांग देण्यापासून करण्यात आली.  मग एकामागून एक बकऱ्यांचा बळी दिला गेला.


गावातल्या म्होरक्याने एका कुटूंबाच्या मागे एक बकरीचा बळी देण्याचे ठरविले होते. गावात जवळपास ५०० घरं आहेत, त्यापैकी ८० टक्के लोक देवी मातेला कोरोना विषाणूपासून मुक्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी बकऱ्यांचा बळी देत आहेत. यापूर्वी लोकांनीही गावचे मंदिर रंगवले होते आणि तेथे पठण केले होते. आज या पठणाचा समारोप झाला. यानंतर हवन करण्यात आले. हवनानंतर यज्ञ सुरू झाला. या संदर्भात, ग्रामीण स्त्रियांनी सांगितले की, गावात कोरोना पसरलेला नाही, म्हणून देवीची पूजा एकत्रितपणे केली जात आहे. गावातले लोक त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत होते.

 

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अपशब्द, पोलीस ठाण्यात तक्रार

 

अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

 

अर्णब गोस्वामी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर 

 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

 

‘तू मुझे जानता नही, मै...असं म्हणत पोलिसाला मारहाण करून केले गंभीर जखमी

 

बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट

Web Title: Whatever the superstition, ranchi sacrifice of 400 goats in koderma in blind faith of removing corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.