Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:18 PM2023-01-05T15:18:05+5:302023-01-05T15:24:11+5:30

या नव्या व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. जाणून घ्या कसा सुरू होतो संपूर्ण प्रकार आणि अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे...?

whatsapp honeytrap scam Is the girl video call coming on Whatsapp Don't pick it up by mistake also how to stay safe | Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार

Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार

googlenewsNext

सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सवर लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. आजकाल इंटरनेट युजर्सना व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने ब्लॅकमेल केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने युजरला फसवून त्या बदल्यात पैशांची मागणी करण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे. हा स्कॅम टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

या नव्या व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. नंतर हे स्क्रीन रेकॉर्डिंग पीडित व्यक्तीला पाठवले जाते आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैशांची ही मागणी करताना पैसे न पाठवल्यास संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकीही पीडित व्यक्तीस दिली जाते. यानंतर आपली बदनामी टाळण्यासाठी लोक याला बळी पडतात आणि पैसे देतात.

अशी सुरू होते स्कॅमची सुरुवात -
सर्वप्रथम एका अनोळखी नंबरवरून मेसेज येतो आणि समोरच्या व्यक्तीला मुलगी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले जाते. याशिवाय, एखाद्या अज्ञात नंबरवरून थेट व्हिडिओ कॉलही येऊ शकतो. यानंतर तुम्ही तो कॉल रिसिव्ह करताच समोरची व्यक्ती तुमचा चेहराही रेकॉर्ड करते.

व्हिडिओ कॉलदरम्यान नेमकं काय होते? -
बहुतांश प्रकरणांमध्ये कॉल करणाऱ्याचा चेहरा दिसत नाही. तर एक वेगळीच मुलगी अश्‍लील कृत्य करताना दिसते. याच वेळी ही मुलगी त्यासंदर्भात तुमची प्रतिक्रियाही नोंदवत असते आणि समोरच्याला त्याचा चेहरा रेकॉर्ड होत असल्याची साधी भनकही  लागत नाही. काहीवेळा तर समोर मुगलीसुद्धा नसते आणि स्कॅमर्स रेकॉर्डिंग करत असतात. या अश्‍लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग कॉल संपताच पीडित व्यक्तीला पाठवले जाते.

...अन् मग सुरू होते ब्लॅकमेलिंग -
या अश्लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत, स्कॅमर्स संबंधित व्यक्तीकडे पैशांची मागणी करतात. यानंतर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीकडे वारंवार पैसे मागितले जातात. व्हिडीओ कॉल दरम्यान केलेली आपली कृत्ये व्हायरल होऊ नये, म्हणून पीडित व्यक्तीही पैसे देत राहते.

अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे? -
जर यदा कदाचित अशा प्रकारच्या स्कॅमला बळी पडलाच तर कुठल्याही प्रकारे पैसे न देता सरळ पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करा. कोणत्याही अनोळखी नंबरवरून चुकूनही व्हिडिओ कॉल्स घेऊ नका. कारण काही सेकंदांसाठीही तुमचा चेहरा दिसणे स्कॅमर्ससाठी पुरेसे आहे. याशिवाय, कुणावरही ऑनलाइन विश्वास ठेवण्याची चूक करू नका. तसेच तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर, तुमचा सेल्फी कॅमेरा सर्वप्रथम बंद करून ठेवा आणि मगच कॉलवर जा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेऊ शकता.

Web Title: whatsapp honeytrap scam Is the girl video call coming on Whatsapp Don't pick it up by mistake also how to stay safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.