व्हिडीओ कॉलवर महिलेने काढले कपडे आणि 75 वर्षीय व्यक्तीला लावला 2 लाखांचा चूना...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 01:45 PM2022-09-15T13:45:50+5:302022-09-15T13:46:17+5:30
Cyber Fraud: याप्रकरणी वृद्ध व्यक्तीकडून 2.21 लाख रूपये लाटण्यात आले. चला जाणून घेऊ पीडितने इतके पैसे दिले कसे आणि कशी झाली त्याची फसवणूक...
Cyber Fraud: घाटकोपरचा एक 75 वर्षीय एका व्यक्तीची काही दिवसांपूर्वीच एक महिलेसोबत व्हिडीओ कॉलवरून फसवणूक झाली. त्यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याना ब्लॅकमेल करण्यात आलं. हे प्रकरणी पोलिसांकडे आणि पत्रकारांकडे गेलं. याप्रकरणी वृद्ध व्यक्तीकडून 2.21 लाख रूपये लाटण्यात आले. चला जाणून घेऊ पीडितने इतके पैसे दिले कसे आणि कशी झाली त्याची फसवणूक...
व्हॉट्सअॅपवर आला होता व्हिडीओ कॉल
हिंदुस्थानच्या टाइम्सच्या वृत्तानुसार, या केसची चौकशी करत असलेल्या घाटकोपर पोलिसांनुसार, पीडित व्यक्तीला 5 सप्टेंबरला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज मिळाला होता. ज्यात लिहिलं होतं की, 'मी जयपूरची आहे'. यानंतर त्याच नंबरवरून व्हिडीओ कॉल आला. कॉल आल्यावर त्याला दिसलं की, एका महिला व्हिडीओ कॉलदरम्यान कपडे काढत आहे. तिने व्यक्तीलाही तसंच करण्यास सांगितलं. तेव्हा व्यक्तीने फोन कट केला.
आयपीएस ऑफिसर बनून मागितले पैसे
काही तासांनी त्याला आणखी एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'कॉलरने तो दिल्ली पोलिसात आयपीएस अधिकारी असल्याचं सांगितलं आणि त्याने तक्रारदाराला सांगितलं की, त्याच्याकडे एका महिलेसोबतचा त्याचा व्हिडीओचं रेकॉर्डिंग आहे. जर त्याने 30,500 रूपये मिळाले नाही तर हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला जाईल. त्याने 75 वर्षीय व्यक्तीसोबत बॅंक अकाऊंट डिटेल्स शेअर केले.
मग पत्रकार बनून मागितले पैसे
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, फेक पोलिसाने तक्रारदार व्यक्तीला त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आणि म्हणाला की, जर त्याने पैसे पाठवले नाही तर तो मोठ्या अडचणीत सापडेल. घाबरून वृद्ध व्यक्तीने फोन करणाऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले.
यानंतर त्यांच्याकडे आणखी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, फोन करणाऱ्या स्वत:ला पत्रकार राहुल शर्मा असल्याचं सांगितलं आणि 50 हजार रूपये दिले नाही तर व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. जेव्हा पीडितने पैसे ट्रान्सफर केले तेव्हा आरोपी त्याच्याकडून आणखी मिळवण्यासाठी उत्साहीत झाला. त्याने पीडितकडून एकूण 2.21 लाख रूपये लुटले.
जेव्हा त्यांनी आणखी पैशांची मागणी केली तेव्हा पीडितने 12 सप्टेंबरला पोलिसांना संपर्क केला. घाटकोपर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात एका वृद्ध व्यक्तीकडून जबरदस्ती पैसे वसूल केल्याची तक्रार दाखल केली.