तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 09:55 AM2023-09-26T09:55:22+5:302023-09-26T09:55:38+5:30

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

Where do your money makers sit? | तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या सायबर क्राइम हे सुसंस्कृत समाजासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन पद्धतींमुळे पोलिसही चक्रावतात. यापूर्वी झारखंडमधील जामतारा आणि हरयाणातील नूह या जिल्ह्यांना देशातील सायबर गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखले जायचे. आता राजस्थानचे भरतपूर आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा हे जिल्हे सायबर भामट्यांचा नवा अड्डा  म्हणून उदयास आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (एफसीआरएफ), आयआयटी-कानपूर स्थित एक ना-नफा स्टार्टअप, ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ च्या अहवालानुसार, देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी तब्बल ८० टक्के गुन्हे फक्त १० ठिकाणांहून घडतात. 

यूपीआय, कार्डद्वारेही
ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांच्या ४७.२५ टक्के घटना यूपीआयच्या माध्यमातून घडत आहेत. याशिवाय ११.२७ टक्के घटनांमध्ये सायबर भामट्यांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नावावर तसेच सिम-स्वॅपद्वारे फसवणूक केली जाते.

हॅकिंगद्वारे फसवणूक
सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक ७७.४१ टक्के गुन्हे आर्थिक, १२.०२ टक्के गुन्हे ऑनलाइन आणि इंटरनेट मीडियाशी संबंधित आणि १.५७ टक्के गुन्हे हॅकिंगशी संबंधित आहेत.


 

Web Title: Where do your money makers sit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.