'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:48 PM2022-05-11T13:48:31+5:302022-05-11T13:51:22+5:30

Rape Case : शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली.

'Where will you go without clothes' ... Cleaner raped a pregnant woman in the hospital | 'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार 

'कपड्यांशिवाय कुठे जाशील'... रुग्णालयात क्लिनरने गरोदर महिलेवर केला बलात्कार 

googlenewsNext

 

उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये मंडल रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर रुग्णालयातील सफाई कामगाराने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही महिला तीन महिन्यांची गर्भवती होती. प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी विभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शनिवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात साफसफाईचे काम करणाऱ्या साहिल या सफाई कामगाराने बलात्काराची घटना घडवली. महिला रुग्ण वॉर्डातील बाथरूममध्ये जाऊन रक्त स्वच्छ करण्यासाठी कपडे बदलत असताना ही घटना घडली.

महिलेचा आरोप आहे की, त्यानंतर आरोपी सफाई कर्मचारी बाथरूममध्ये घुसला आणि आधी सर्व कपडे बाहेर फेकले आणि कपड्यांशिवाय कुठे जाणार असे सांगितले. यानंतर बळजबरीने तिचे तोंड बंद करून तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर काही महिला तेथे आल्या आणि आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर महिलेला विभागीय रुग्णालयातून रेफर करण्यात आले. त्यानंतर ती तिच्या घरी गेली. घटनेच्या वेळी पती रुग्णालयात नव्हता. हा प्रकार पतीला समजताच त्याने महिलेला जिल्हा महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

मदरशात शिकवणाऱ्या मुफ्तीनं ११ वर्षीय मुलावर १९ वेळा केला लैंगिक अत्याचार

रुग्णासोबत घडलेल्या या खळबळजनक घटनेनंतर पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंग हेही महिला रुग्णालयात पोहोचले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांनी आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगितलं.

Web Title: 'Where will you go without clothes' ... Cleaner raped a pregnant woman in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.