40 हजाराची लाच घेताना सहाय्यक संचालकास किशोर गिरोल्ला रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 08:53 PM2018-09-28T20:53:43+5:302018-09-28T20:56:46+5:30
अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे आज 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
जयंत धुळप
अलिबाग - येथील रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबीनमध्ये 40 हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून आज संध्याकाळी साडेपाच वाजता रंगेहाथ अटक केली आहे.
अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे आज 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी केल्यानंतर लाचेची रक्कम 40 हजार रुपये ठरविण्यात आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जावून या बाबत रितसर तक्रार दाखल केली. तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबीन सापळा रचून त्यास ४० हजार रुपयांची लाच घेताना शिताफीने अटक केली आहे. सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरक्षक किरण बकाले हे करित आहेत.