देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दाऊदच्या पुतण्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:17 PM2019-07-18T13:17:54+5:302019-07-18T14:43:57+5:30
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती.
मुंबई : कुख्यात अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दोन साथीदारांसह खंडणीखोरी प्रकरणी मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले आहे.
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान असे त्याचे नाव असून मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रिझवान देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली.
Rizwan, son of Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar, & two others brought to the office of Mumbai Police Anti-Extortion Cell. All three accused will be produced before the court, later today. Rizwan was arrested last night from Mumbai Airport. pic.twitter.com/nWT1zgTOHa
— ANI (@ANI) July 18, 2019
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अहमद रझा वधारिया याला अटक केली होती. दाऊदच्या टोळीचा खंडणीखोर फहीम मचमच याचा तो जवळचा साथीदार आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वधारियाच्या चौकशीमध्ये रिझवानचे नाव पुढे आले होते. यानुसार मिळालेल्या माहितीवर गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर सापळा लावला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रिझवानला भारताबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक करण्यात आली.
#UPDATE Two other people were also arrested by the Mumbai Police Anti-Extortion Cell, last night, along with Rizwan (son of Dawood Ibrahim's brother, Iqbal Kaskar). https://t.co/WsD4nBioxK
— ANI (@ANI) July 18, 2019