गर्लफ्रेंडसोबत 'मर्दानी-2' चित्रपट पाहत असतानाच पतीसमोर अवतरली घरची मर्दानी आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 06:58 PM2019-12-24T18:58:20+5:302019-12-24T19:02:20+5:30
पत्नीने आपल्या पतीला कॉर्नर सीटवरुन घसटत सिनेमा हॉलबाहेर आणले आणि पोलिसांना पाचारण केले.
अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका सिनेमा हॉलमध्ये राणी मुखर्जीचा 'मर्दानी -2' हा चित्रपट प्रेयसीसोबत चित्रपट पाहताना घरच्या मर्दनाने म्हणजेच पत्नीने पतीला रंगेहाथ पकडून चोप दिला. प्रियेसीसोबत पाहून संतापलेल्या पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला 'दबंग' म्हणून मारहाण केली. इतकेच नाही तर पत्नीने आपल्या पतीला कॉर्नर सीटवरुन घसटत सिनेमा हॉलबाहेर आणले आणि पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तिघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, नातेसंबंधात फसवणूक हा गुन्हा नसल्यामुळे पोलिसही असहाय्य झाले आणि समजूत काढून तिघांनाही त्यांच्या घरी पाठवले. नवरंगपुरा पोलिसांनी सांगितले की, 'दबंग' बनलेल्या पत्नीला तिच्या मित्राने तिचा नवरा मर्दानी -2 सिनेमा हॉलमध्ये पाहत असल्याचे सांगितले. यावर पत्नी म्हणाली की यात काय मोठी गोष्ट आहे, त्यानंतर तिच्या मित्राने सांगितले की तुझ्या नवऱ्यासोबत एक महिला आहे.
बायको जबरदस्तीने थिएटरमध्ये शिरली
हे ऐकून पत्नी सिनेमा हॉलमध्ये पोहोचली आणि सुरक्षा यंत्रणेला धमकी देत जबरदस्तीने थिएटरमध्ये प्रवेश केला. तिने दुसर्या बाईसह तिच्या पतीला रोमांस करताना रंगेहाथ पकडले. पत्नीने पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याला ठार मारण्यापासून रोखले तेव्हा आरोपी पतीच्या पत्नीने तिचे केस खेचले आणि तिलाही मारहाण केली.
पोलिसांनी सांगितले की आरोपी आरोपी पतीस यापूर्वी सलमान खानच्या दबंग-3 च्या चित्रपटाचे तिकीट घ्यायचे होते. मात्र, ते न मिळाल्याने त्याने मर्दानी -2 चे तिकीट घेतले. अगदी थोड्या गर्दीमुळे तो पकडला गेला. नात्यात फसवणूक हा गुन्हा होत नसल्याने या तिघांना गुन्हा नोंदविल्याशिवाय त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.