व्हिडीओ पाहताना लिंक आली अन् झाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:48 AM2023-12-21T08:48:26+5:302023-12-21T08:48:32+5:30
शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : फॉरेन एक्स्चेंज कन्वर्जन चार्जेस आणि होल्ड झालेली रक्कम डिक्रीज करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून ११ लाख ८० हजार १०४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आचला दिलीप चव्हाण या व्हिडीओ पाहत असताना लिंकवर क्लिक केले.
त्यानंतर त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हॉइस कॉल आला. गुंतवणूक माहितीसाठी १५० डॉलर भरा, असे सांगितले. त्यानुसार १२ हजार ५०० भरले. फायनान्शिअल ॲडव्हायझर नेमला जाईल, तो तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पैसे कुठे व कसे गुंतवायचे हे सांगेल, असे सांगताच विश्वास ठेवला.
११.८० लाख रुपयांना गंडा; तिघांवर गुन्हा
शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर चांगला फायदा होईल व बिटकॉइन व शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सांगितली. यावेळी शेअर्समध्ये मिळालेले ३२ हजार ६६७ डॉलर जमा झाले. भारतीय चलनानुसार ३० लाख ७० हजार रुपये एवढे असून, ते विड्रॉलसाठी गेले असता बँकेचा तपशील भरण्यास सांगितले. यावेळी अकाउंटमधील बॅलन्स शून्य दाखवला. कॅपिटल गेम टॅक्स, फॉरेन एक्स्चेंज कन्वर्जन चार्जेस, होल्ड झालेली रक्कम डिक्रीज करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून टप्प्याटप्प्याने ११ लाख ८० हजार १०४ रुपये ट्रान्सफर केले. रक्कम परत न केल्याने तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.