मुंबईतील स्फोटकांमागे नक्की कोणाचा हात? ‘जैश’च्या भूमिकेमुळे नवा संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:19 AM2021-03-01T06:19:25+5:302021-03-01T06:19:47+5:30

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला.

Who exactly is behind the Mukesh ambani's House explosives | मुंबईतील स्फोटकांमागे नक्की कोणाचा हात? ‘जैश’च्या भूमिकेमुळे नवा संभ्रम

मुंबईतील स्फोटकांमागे नक्की कोणाचा हात? ‘जैश’च्या भूमिकेमुळे नवा संभ्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची रविवारी दिवसा मिळालेली माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने रात्री स्पष्ट केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. त्यामुळे या स्फोटामागे नक्की कोण आहे, याचा संभ्रम कायम आहे. संंघटनेच्या टेलिग्राम ॲपवरील पेजवरून ही  माहिती देण्यात आली होती. मात्र हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचे  सांगत  पाेलिसांनी तिला दुजोरा दिला नव्हता. गुन्हे शाखा तसेच राज्य दहशतवादविरोधी पथक याचा अधिक तपास करत आहेत.


याआधी दिल्लीतील दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणातही असा दावा केला होता. मात्र तपासात तसा पुरावा हाती लागला नाही. मुंबईतील स्फोटकांप्रकरणी अद्याप दहशतवादी संघटनेचा संबंध समोर आलेला नाही.

लढा संघ-भाजपशी 
आमचा लढा धर्मनिरपेक्ष लोकशाही, रा. स्व. संघ, भाजपच्या विचारधारेशी आहे. मोदींच्या मुस्लिमविरोधी भूमिकेशी आहे. उद्योगपतींशी नाही, असे सांगत या संघटनेने या स्फोटकांशी असलेला संबंध नाकारला. टेलिग्रामवरील पोस्टबाबत त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणांनाच जबाबदार धरले.

हा फक्त एक ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे!
nजैश-उल-हिंदच्या नावे टेलिग्रामवरील संदेशात ‘मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे. हा फक्त एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे’, असे म्हटले होते. 
nबिटकॉइनच्या स्वरूपात अंबानी यांच्याकडून रकमेची मागणी करीत ‘आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढच्या वेळेस ही कार तुमच्या मुलांच्या मागे असेल’, अशी धमकी त्यात होती. ‘तुम्हाला जमत असेल, तर आम्हाला थांबवून दाखवा’ असे आव्हानही तपास यंत्रणांना दिले होते. मात्र, स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या धमकीपत्रात पैशांची मागणी करण्यात आली नव्हती. संघटनेचे हे पेज पोलिसांनी नियंत्रित केले आहे. 

Web Title: Who exactly is behind the Mukesh ambani's House explosives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.