कोण आहे अद्वैता काला? जॅकलीनच्या सांगण्यावरून सुकेशने तिला पाठवले होते १५ लाख रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:33 PM2022-05-02T17:33:00+5:302022-05-02T17:34:37+5:30
Advaita Kala connection with Sukesh Chandrashekhar: ईडीने सांगितलं की, सुकेश चंद्रशेखरने दिल्ली तुरूंगात राहून २०० कोटींपेक्षा जास्त रूपयांची लोकांची फसवणूक केली होती. आणि या पैशांचा वापर तो ऐशो-आरामात जगण्यासाठी आणि सिने अभिनेत्रींवर उडवण्यासाठी करत होता.
Advaita Kala connection with Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीने कारवाई करत जॅकलीन फर्मांडिस (Jacqueline Fernandez) ची ७.२५ कोटी रूपयांची संपत्ती अटॅच केली आहे. अटॅच केलेल्या संपत्तीमध्ये ७.१२ कोटी रूपयांचे बॅंकेत जमा फिक्स डिपॉझिट आहे आणि इतर काही गिफ्ट आहेत जे सुकेशने जॅकलीनला दिले होते.
ईडीने सांगितलं की, सुकेश चंद्रशेखरने दिल्ली तुरूंगात राहून २०० कोटींपेक्षा जास्त रूपयांची लोकांची फसवणूक केली होती. आणि या पैशांचा वापर तो ऐशो-आरामात जगण्यासाठी आणि सिने अभिनेत्रींवर उडवण्यासाठी करत होता. याच पैशातून त्याने साधारण ५.७१ कोटी रूपयांचे गिफ्ट दिले होते. त्यासोबतच सुकेशने जॅकलीनच्या परिवारातील लोकांनाही काही रक्कम दिली होती. जी त्याने हवाला उद्योजक अवतार सिंहच्या माध्यमातून पाठवले होते.
त्यासोबतच खास बाब म्हणजे सुकेश चंद्रशेखरने तुरूंगात बसून जॅकलीनकडून स्क्रिप्ट रायटर अद्वैता कालाला १५ लाख रूपये पाठवले होते. हे पैसे पाठवले होते कारण जॅकलीनला एका वेब सीरिज बनवायची होती आणि त्यासाठी अद्वैता कालाला कथा लिहिण्यासाठी सांगण्यात आलं होतं.
जॅकलीनने जुलै २०२१ मध्य़े अद्वैता कालासोबत स्वत:साठी एक वेब सीरिज लिहिण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. ज्यासाठी अद्वैता कालाने जॅकलीनला ३० लाख रूपयांची मागणी केली होती. २९ जुलै २०२१ला जॅकलीनने अद्वैताला इमेल पाठवला होता. ज्यानंतर ३० जुलै २०२१ ला अद्वैतने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी ३० लाख रूपयांची मागणी केली.
यासोबतच काम लगेच सुरू करण्यासाठी अद्वैताने १५ लाख रूपयांचा अॅडव्हान्स पाठवण्याची मागणी केली. ज्यावर होकार देत जॅकलीनने अद्वैता कालाला पत्ता विचारला आणि सांगितलं की पैसे लगेच पोहोचतील. कारण जॅकलीन मुंबईत होती आणि अद्वैता काला गुरूग्राममध्ये राहत होती.
दोन ऑगस्ट २०२१ ला जॅकलीनने अद्वैताला सांगितलं की, काही वेळाने एक व्यक्ती तिच्याकडे १५ लाख रूपये रोख घेऊन येईल. पैसे घेतल्यानंतर अद्वैत कालाने जॅकलीनला Whatsapp वर पैसे मिळाल्याची माहितीही दिली. ईडीने सांगितलं की, जॅकलीनकडून अद्वैतला कालाला देण्यात आलेले १५ लाख रूपयेही अटॅच करण्यात आले आहेत. कारण हेही पैसे सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रूपयांपैकीच आहेत.
कोण आहे अद्वैता काला?
अद्वैता काला एक प्रसिद्ध लेखिका आणि स्क्रिप्ट रायटर आहे. अद्वैता कालाने अनेक सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. अनेक टीव्ही न्यूज चॅनल्सवर ती चर्चेत सहभागी असते. अद्वैताचे वडील एक रिटायर्ड ब्यूरोक्रेट आहेत आणि एक बहीण आहे जी अमेरिकेत राहते. अद्वैता गुरूग्राममध्ये राहते. जॅकलीनकडून पैसे मिळाल्यावर काही दिवसांनी ईडीने अद्वैताला चौकशीसाठी बोलवलं होतं.