आयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल १७ कोटींचे घबाड, खाण घोटाळ्याप्रकरणी ED ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:44 AM2022-05-07T03:44:16+5:302022-05-07T03:45:04+5:30
पूजा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.
एस. पी. सिन्हा
रांची : झारखंडमध्ये खाण घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करीत आयएएस अधिकारी आणि खाण, भूविज्ञान विभागाच्या सचिव पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर शुक्रवारी धाडी घातल्या. पूजा सिंघल यांच्याकडे जवळपास १७ कोटींपेक्षा अधिक नगद सापडल्याची माहिती आहे. झारखंडच्या रांची, खुंटी, राजस्थानच्या जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राममध्ये, प.बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्लीच्या एनसीआरमध्ये धाडी टाकल्या आहेत. पूजा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात.
कोण आहेत पूजा सिंघल?
- पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या खुंटी जिल्ह्यात कार्यरत होत्या. त्या सध्या खाण व भूविज्ञान विभागाच्या सचिव व खनिज विकास महामंडळाच्या मुख्य संचालक आहेत.
- झारखंडमध्ये मनरेगात झालेल्या १८.०६ कोटींच्या घोटाळ्याच्या वेळी त्या खुंटी जिल्ह्यात जिल्हाधिकारी होत्या. तपासात ज्युनिअर इंजिनीयर राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- त्यानंतर सिन्हा यांना १७ जून २०२० रोजी प.बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून ईडीच्या टीमने अटक केली होती.