Video : कोण निर्भया आणि ती का गेली होती दिल्लीला?, सीएमओचा उद्धटपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 04:59 PM2020-02-12T16:59:01+5:302020-02-12T17:03:35+5:30
उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने (सीएमओचा) उद्धटपणा केल्याचे एका व्हिडिओद्वारे दिसून येत आहे.
नवी दिल्ली - २०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला दिवसेंदिवस विलंब होत असताना निर्भयाच्या नातेवाईकांसोबत उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने (सीएमओचा) उद्धटपणा केल्याचे एका व्हिडिओद्वारे दिसून येत आहे. निर्भयाच्या मूळ गाव असलेल्या बलियामध्ये निर्भयाच्या नावाचे रुग्णालय बनविण्यात आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांच्या मागणीसाठी निर्भयाचे नातेवाईकांनी धरणे आंदोलन पुकारलं होतं. दरम्यान, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी निर्भयाच्या आजोबांशी हुज्जत घातली आणि म्हणाले की, ''ज्या गावात कोणीही डॉक्टरकीचा अभ्यास केला नाही. त्या गावातील रुग्णालयाला आम्ही डॉक्टर देणार नाही.'' त्यावर आजोबांनी सीएमडीला निर्भयाचा अपमान करू असे सांगितले. निर्भया कोण? जर ती वैद्यकीय शिक्षण घेत होती तर ती दिल्लीला का गेली होती? असा उद्धट प्रश्न सीएमडीने आजोबांना केला.
Ballia:Verbal spat erupted b/w Chief Medical Officer of a primary healthcare center&relative of 2012 Delhi gang-rape case,after villagers sit on a protest demanding doctors&basic facilities at center. CMO says,"Who's Nirbhaya?If she was studying medicine,why did she go to Delhi?" pic.twitter.com/Y91dEx9SRj
— ANI UP (@ANINewsUP) February 12, 2020
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमओने हे रुग्णालय आम्ही बनवले नसल्याचे सांगितले. तसेच पुढे सीएमओ म्हणाला ज्यांनी हे रुग्णालय बांधलं त्यांच्याकडे डॉक्टरची मागणी करा. सीएमओने निर्भयाला देखील न सोडता तिच्याबाबत उद्धटपणे उद्गार काढत म्हणाला, निर्भया कोण आहे, जर ती वैद्यकीय शिक्षण घेत होती तर ती दिल्लीला का गेली?.
निर्भयाच्या मूळगावी सरकारने निर्भयाच्या नावाचे रुग्णालय बनवले आहे. जेणेकरून निर्भयाचे स्वप्न पूर्ण होईल. निर्भयाचे डॉक्टर बनून गावात रुग्णालय सुरु करण्याचे असं स्वप्न होतं. जेणेकरून गावातील लोकांना गावाबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. सरकारकडून पाच वर्षांपूर्वी अर्धवट रुग्णालयाचे काम करण्यात आले. मात्र, अद्याप त्या रुग्णालयात डोक्टर आणि नर्स नाहीत. म्हणून निर्भयाचे आजोबा यांनी अगुवाई येथील स्थानिकांसोबत धरणे आंदोलन केले. त्यावेळी सीएमओ आंदोलनाठीकाणी नागरिकांना आश्वासन देण्यासाठी पोचले. मात्र त्यांनी निर्भयाच्या आजोबांसहित गावकऱ्यांचा अपमान केला.
Nirbhaya Case : नवं डेथ वॉरंट जारी करा! असं म्हणत निर्भयाच्या आईने कोर्टात फोडला टाहो
Nirbhaya Case :...म्हणून निर्भयाच्या दोषीने सर्वोच्च न्यायालयात केली रिट याचिका दाखल