इराणी म्हणतायेत काय कुणाची भीती? आंबिवलीतील इराणी वस्तीची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 08:46 AM2021-04-28T08:46:44+5:302021-04-28T08:47:25+5:30
मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले होते.
- मयुरी चव्हाण
कल्याण : कल्याण नजीक असलेल्या आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील अट्टल गुन्हेगारांची वस्ती असलेला इराणी काबीला हा नेहमीच पोलिसांच्या हीटलिस्ट वर राहिला आहे.काबिल्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याचे सत्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत.त्यामुळे या काबिल्यांची दहशत मोडीत काढताना पोलिसही हतबल झाले आहेत. या परिसरात नुकतीच पोलिसांसमोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे इराणी काबिल्यांची दहशत ही दिवसेंदिवस वाढतच असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले होते. आंबिवलीमध्ये इराणी नागरिकांनी स्वतःची घरे घेतली असून या ठिकाणी 200-250 घरे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. येथील नागरिक बलुची भाषा बोलत असल्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना ही भाषा समजत नाही. तसेच पोलिसांकडे पाहून इराणी महिला बलुची भाषेत अर्वाच्य शब्दही वापरतात अशी माहितीही समोर आली आहे.गॉगल व इतर प्रकारचे चष्मे विकण्याचा व्यवसाय करणारे इराणी हे सोनसाखळी व इतर दागिनेही चलाखीने लंपास करण्यात त्यांचा हातखंडा आहेत अट्टल सोनसाखळी चोर हे चो-या करून स्टेशनजवळ असलेल्या कबिल्यात लपून बसतात. गुन्हेगारीमध्ये बहुतांश तरुण सक्रिय असून उंच व धिपाड अशी या तरुणांची शरीरयष्टी आहे.
कबिल्यातील मुलांना शिक्षणात रस नसून गुन्हेगारीत करियर करण्याकडे या नागरिकांचा ओढा आहे. समन्वय साधून पोलिसांनी येथील नागरिकांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे सुधारण्याची संधी देऊनही काबिल्याने ती धुडकावली.कल्याण कसारा मार्गावर सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडत असतात.चोरी केली की लागलीच स्टेशन जवळ असलेल्या काबिल्यात चोर पळ काढतात . पोलीस कारवाईसाठी आले तर त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी रॉकेलचे डब्बे , रॉड व इतर साहित्यही काबिल्यात उपलब्ध असते. त्यामुळे हे काबिले गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान झाले असून काबिल्याची दहशत मोडून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
दागिन्यांचा मोह
सोनसाखळी चोरी करण्यात इराणी तरबेज आहेत. इराणी टोळ्यांना धूम स्टाईल , हातचलाखीने महिलांचे दागिने लंपास करण्याकडे या टोळ्यांचा अधिक कल आहे. अनेक वॉन्टेड सोनसाखळी चोर हे आंबिवली येथील काबिल्यात राहतात. दागिने चोरी केले किती इराणी महिला दागिने विकण्याचे काम करतात. तसेच काबिल्यात पोलीस आल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी महिलाच पुढे जातात. त्यानंतर आरोपीना जामीन देण्याचे कामही महिलाच करतात.
* घरामध्ये स्वयंपाकाचे सामान नाही
अनेकदा पोलिसांनी आंबिवली येथील इराणी वस्तीत छापा टाकल्यावर त्यांना या ठिकाणी स्वयंपाकाचे सामान कधीच आढळून आले नाही. इराणी नागरिक घरात स्वयंपाक करत नसून बाहेरच खाद्यबभ्रमंती करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे हायफाय कॉस्मेटिक्स आणि कपडेच इराण्यांच्या घरात असतात.
चोरीच्या आयडिया
- हातचलाखी आणि नागरिकांना गोंधळून टाकणे
- दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा
- बँकेत सावज शोधून पैसे मोजून देण्याचा बहाणा
- दागिने पिशवी ठेवा , पुढील चौकात दंगल चालू असल्याची नागरिकांना थाप
इराणी काबिल्यांची दहशत ही वाढत चालली नसून कमी।झालेली आहे. गेल्या दोन तीन वर्षांत पोलीस प्रशासनाने या संदर्भात सहा ते सात मोक्का कलम लावले आहेत. या दोन वर्षात काबिल्यामधील जवळपास 50 आरोपी हेे बाहेरच्या राज्याांना पकडून दिले आहेत. पोलिसांना माहिती देणारे व न देणारे असे दोन गट या इराणी वस्तीत तयार
झाल्याने दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.
- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ 3