Video : मास्क का घातला नाही? असे विचारताच NSG कमांडोने पोलीस अधिकाऱ्यांला मारला ठोसा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:45 PM2021-06-30T19:45:26+5:302021-06-30T19:47:59+5:30
NSG commando punched the police officer : ही घटना आज सायंकाळी नगर नाका येथे सायंकाळी घडली.
औरंगाबाद : विना मास्क जाणाऱ्या आर्मी जवानाला रोखल्याने झालेल्या वादात जवानाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पी एस भागीले यांना मारहाण केली. ही घटना आज सायंकाळी नगर नाका येथे सायंकाळी घडली.
गणेश गोपीनाथ भुमे (३४, रा. फुलंब्री) असे मारहाण करणाऱ्या जवानाचे नाव आहे. गणेश हा रेंजर टू. एनएसजी. सेंट्रल आर्म पोलिस फोर्स दिल्ली येथे कार्यरत आहेत. तो फुलंब्रीचा राहणारा असून सध्या सुट्टीवर आला. डेल्टा प्लेस साठरोगाच्या पार्श्वभूमीवर छावणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग भागिले आणि कर्मचारी अन्य पोलिस कर्मचारी नाकाबंदी करीत होते. या वेळी भूमे हा जीप घेऊन जाऊ लागला. विना मास्क असल्याने पोलिसांनी त्यास रोखले असता त्याने तो एन एस जी कमांडो असल्याचे सांगितले.
औरंगाबाद येथे विना मास्क जाणाऱ्या आर्मी जवानाला रोखल्यावरून झालेल्या वादात जवानाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. भागीले यांना मारहाण केल्याची घटना; नगर नाका येथे सायंकाळी ही घटना घडली pic.twitter.com/W5JCGmpN6T
— Lokmat (@MiLOKMAT) June 30, 2021
पोलिसांनी त्यास जीपमधून उतरण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्याने 3 एपीआय भागील यांना जोराचा ठोसा मारला. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आणि जखमेतून रक्त निघू लागले. यावेळी त्याला पकडणाऱ्या अन्य पोलिसांसोबत झटापट केली. यात हवालदार टाक यांची पॅन्ट फाटली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या ची प्रक्रिया छावणी ठाण्यात सुरु होती