विधवा महिलेने एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने प्रियकराची केली हत्या, मृतदेह रात्रभर सोबत ठेवला, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:50 PM2022-07-20T16:50:37+5:302022-07-20T17:13:29+5:30
Murder case :याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
राजनांदगाव : छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी एका हत्येचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा लालबाग पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून आरोपीने ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. १३ जुलै रोजी बगतराई ते लिटिया गावादरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. राजनांदगाव पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.
राजनांदगावचे पोलीस अधीक्षक प्रफुल्लकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हत्येचे गूढ उकलल्याचा दावा केला. १३ जुलै रोजी बागतराई आणि लिटिया या गावादरम्यान पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लालबाग पोलीस स्टेशन करत होते. हिरावन मांडले (वय ३१ वर्षे) असे मृताचे नाव असून तो लिटिया गावचा रहिवासी आहे. मृताची ओळख पटल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले. तपासादरम्यान, आरोपी गावातील एका विधवा महिलेशी संबंधित असल्याचे पोलिसांना समजले, पोलिसांनी महिलेवर संशय घेऊन चौकशी केली.
एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खून
पोलिस तपासात आरोपी महिलेने तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने संपूर्ण घटना घडवून आणल्याचे सांगितले. अवैध प्रेमसंबंधातून आरोपीने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. आरोपींनी मृताच्या डोक्यात शीग मारून खून केला होता. खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. आरोपी महिला मोमीन वर्मा आणि तिचा प्रियकर डिकेश्वर वर्मा या दोघांनी मिळून मृत तरुणाची हत्या केली. आरोपींनी पद्धतशीरपणे मृताला फोन करून घरी बोलावून घेतले आणि घरातच तरुणाची शीग मारून हत्या करून मृतदेह रात्रभर घरात ठेवला, त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला नेऊन फेकून दिला. मृतकाला वारंवार भेटण्याच्या दबावाला कंटाळून आणि शिवीगाळ करत असल्याने आरोपी महिला आणि तिच्या माजी प्रियकराने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.