विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 07:33 PM2022-05-23T19:33:04+5:302022-05-23T19:34:23+5:30
GangRape Case : 19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली.
तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 29 वर्षीय विधवेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला, मारहाण केली आणि तिच्याजवळील सोनंही लुटले. त्यांनी या संपूर्ण गुन्ह्याचा व्हिडिओही बनवला.
19 मे रोजी वीसनम तलावाजवळ ती तिच्या मित्रासोबत होती. तेव्हा चार जणांनी तिला घेरले आणि लुटले, अशी तक्रार महिलेने नोंदवली. तिने 12 ग्रॅम सोन्याची चेन घातली होती, ती नराधमांनी पळवली.
गुन्हेगारांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिला एका निर्जन स्थळी नेले आणि जिथे तिच्यावर अनेक तास सामूहिक बलात्कार करण्यात आला. या टोळीने तिच्या मित्रावर क्रूरपणे हल्ला केला, तिला लुटले आणि गुन्ह्याचा व्हिडीओ बनवण्यासाठी तिचा फोन घेतल्याचेही पीडितेने नमूद केले. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी त्यांना सोडून दिले.
त्यानंतर पीडितेने नमक्कल पोलिसांत तक्रार दाखल केली. आयटी कायद्याच्या कलम 392, 376 बी, 506 (1) आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवीन कुमार (21), दिनेश कुमार (21) आणि पेंटर म्हणून काम करणाऱ्या मुरलीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.