'मी राजेशची चौथी पत्नी आहे, ती पळाल्या...', विष पिऊन पोलिसांजवळ पोहोचली महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:58 PM2023-04-10T17:58:07+5:302023-04-10T17:58:25+5:30

एक वर्षाआधी त्याचं लग्न झालं होतं. महिलेनुसार, 'काही दिवस त्यांच्यात सगळं काही ठीक सुरू होतं. पण नंतर तो आणि त्याच्या परिवाराचं वागणं बदललं.

Wife accuses bank employee husband of dowry harassment in Patna | 'मी राजेशची चौथी पत्नी आहे, ती पळाल्या...', विष पिऊन पोलिसांजवळ पोहोचली महिला

'मी राजेशची चौथी पत्नी आहे, ती पळाल्या...', विष पिऊन पोलिसांजवळ पोहोचली महिला

googlenewsNext

पटणाच्या पत्रकारनगरमधील एक महिला विष पिऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर एकच खळबळ उडाली. इथे ती पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगत होती. तेव्हाच तिची स्थिती जास्त बिघडली. पोलिसांनी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. महिलेवर आता उपचार सुरू आहेत. 

पत्रकारनगरमध्ये राहणारा राजेश कुमार बॅंक ऑफ इंडियामध्ये पीओ आहे. एक वर्षाआधी त्याचं लग्न झालं होतं. महिलेनुसार, 'काही दिवस त्यांच्यात सगळं काही ठीक सुरू होतं. पण नंतर तो आणि त्याच्या परिवाराचं वागणं बदललं. ते नेहमीच माहेरून हुंडा घेऊन येण्याबाबत बोलत होते'.

महिला पुढे म्हणाली की, 'इतकंच नाही तर तिला रूममध्ये बंद करून मारहाणही केली जात होती. ही सतत होत होतं. पती आणि त्याच्या परिवाराचं वागणं बदलत नसल्याने ती मी कशीतरी तिथून पळून आले. रस्त्या विष प्यायले. नंतर पोलिसांकडे आले'.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती राजेशची चौथी पत्नी आहे. याआधी त्याची तीन लग्ने झाली होती. पण त्याच्या आधीच्या पत्नी सुद्धा पळून गेल्या. तो महिलेला हुंड्यासाठी त्रास देत होता. त्यामुळेच महिलेने हे पाउल उचललं. 

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली. सोबतच महिलेला आपल्या माहेरी पाठवलं आहे. 

Web Title: Wife accuses bank employee husband of dowry harassment in Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.