पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:20 PM2021-02-10T13:20:04+5:302021-02-10T13:28:12+5:30
मास्टरमाइंड पत्नीने पोलिसांना फसवण्यासाठी पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर २०१९ ची आहे. घटनेच्या १५ महिन्यांनंतर आता या ब्लाइंड मर्डरचा खुलासा झाला आहे.
राजस्थानच्या धौलपूरमधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने प्रियकराच्या आणि भावोजीच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जमिनीत दफन केला. आता तब्बल १५ महिन्यांनंतर या घटनेचा खुलासा झाला आहे.
मास्टरमाइंड पत्नीने पोलिसांना फसवण्यासाठी पती बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली होती. ही घटना डिसेंबर २०१९ ची आहे. घटनेच्या १५ महिन्यांनंतर आता या ब्लाइंड मर्डरचा खुलासा झाला आहे. पोलीस अधिक्षक केशर सिंह शेखावत यांनी सांगितले की, रूंध पुरा गावात राहणारी फूलन देवीने ९ डिसेंबर २०१९ ला कॅराली जिल्ह्यातील पोलिसात आपला ४५ वर्षीय पती कमल कुशवाह बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. (हे पण वाचा : भयंकर ! महिलेचा खून करून अर्धवट मृतदेह तलावात फेकला )
(Image Credit : Aajtak)
तक्रारीत सांगण्यात आले की, तिचा पती गंगापूरला औषध घेण्यासाठी गेला होता. त्याला कुणीतरी ओळखीचं रस्त्यात भेटलं आणि पैशांचं आमिष दाखवून त्याला सोबत घेऊन गेले. पण बरेच दिवस होऊनही काहीच समोर न आल्याने फूलन देवीचा मुलगा जीतूने बाडी पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या अपहरणाची तक्रार दिली. जीतूने त्याची आई फूलन देवी, मावसा कप्तान आणि बनवारी पंडीत यांच्या विरोधात तक्रार केली.
पुढे तपासातून समोर आले की फूलन देवीचे बनवारीसोबत अनैतिक संबंध आहे. तो एक पशुचिकित्सक आहे. बनवारी फूलन देवीच्या घरी नेहमी येत-जात होता. जेव्हा दोघांच्या संबंधाची माहिती कमल आणि जीतूला लागली तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यानंतर फूलन देवीने त्याच्या आणि भावोजीसोबत पतीच्या मृत्यूचा प्लॅन तयार केला. (हे पण वाचा : गुंगीचे औषध पाजून चुलत दिरानेच केला महिलेवर बलात्कार, व्हिडीओ केला नातेवाईकांना शेअर)
(Image Credit : Aajtak)
८ डिसेंबर २०१९ ला फूलन देवी तिचे भावोजी कप्तानसोबत पती कमलला औषध देण्यासाठी जात होती. त्यानंतर बसमधून तिघेही एके ठिकाणी उतरले. तिथे बनवारी मोटारसायकलने आला. सर्वांनी कमलला दारू प्यायला दिली. नशेत असतानाच कप्तान आणि बनवारीने त्याला दाबून धरलं आणि फूलन देवीने गमछ्याने गळा आवळून त्याची हत्या केली.
यानंतर बनवारीने मोटारसायकलवरून कमलचा मृतदेह आपल्या रूपसपूर गावात घेऊ आला. येथील त्याच्या शेतात त्याने एक खड्डा करून त्यात कमलचा मृतदेह पुरला. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. तर घटनास्थळावरून पुरावे जमा केले गेले.