पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 02:07 PM2024-01-09T14:07:50+5:302024-01-09T14:08:41+5:30

पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

Wife breaks husband hand after he refused to give necklace worth six lakh rs Aligarh | पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये माफिया अतील अहमदच्या नावाने आपल्या पतीला धमकी देणारी पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे 6 लाख रूपयांचा हार घेऊन न दिल्याने दबंग पत्नीने आपल्या पतीला मारहाण करत त्याचा हात मोडला. ज्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. 
पत्नीकडून मारहाण झालेल्या जखमी पतीवर मलखान सिंह हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

इथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या पीडित वाजिद खान याने सांगितलं की, 17 जुलै 2022 ला बुलंदशहरमधील इकरासोबत त्याचा निकाह रिती रिवाजानुसार झाला होता. ज्यानंतर पत्नीने एका मुलाला जन्म दिला.

वाजिदचा आरोप आहे की, लग्न झाल्यापासून त्याची पत्नी इकरा काहीना काही कारणाने त्याच्यासोबत वाद घालत होती. भांडण आणि मारहाण करणं हा तिचा नियम झाला आहे. याची तक्रार त्याने स्थानिक पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, इकरावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांना समजली तेव्हा ते संतापले. त्यानंतर असं ठरलं की, दोघे वेगळ्या घरात राहतील. पण तरीही इकरा आपल्या पतीला मारहाण करतच होती. इतकंच नाही तर इकराने सासरच्या लोकांनी अतीक अहमदचं नाव घेत धमकी दिली आणि म्हणाली की, 6 लाख रूपयांचा हार घेऊन दे किंवा 6 लाख रूपये अकाऊंटमध्ये टाक.

जेव्हा पत्नीची ही डिमांड पूर्ण करण्यास पतीने नकार दिला तेव्हा ती भडकली आणि तिने त्याला लाटण्याने मारहाण केली. यात वाजिदचा हात मोडला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

पती वाजिद म्हणाला की, पत्नीने माझा हात मोडला आहे. उशी तोंडावर ठेवून जीवे मारण्याचाही प्रयत्न तिने केला. अतीकचं नाव घेऊन घरातील लोकांना धमकी दिली.
या प्रकरणावर सीओ अभय पांडे म्हणाले की, वाजिद खान द्वारे एक प्रार्थना पत्र देण्यात आलं आहे. ज्यात पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी मारहाण केल्याची आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. सध्या चौकशी सुरू आहे.

Web Title: Wife breaks husband hand after he refused to give necklace worth six lakh rs Aligarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.