बोंबला! ३१ लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवलं, पोहचल्यावर म्हणाली - 'फोन केला तर केस करेन'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:25 PM2021-02-03T14:25:16+5:302021-02-03T14:28:46+5:30
फसवणुकीच्या या प्रकरणात तरूणाने पत्नी, सासू, सासरे, मुलीचे मामा, मामी, मामे बहीण विरोधात केस दाखल केली आहे.
पंजाबच्या मोगामधील एका तरूणाने त्याच्या पत्नीला कॅनडाला पाठवण्यासाठी ३१ लाख रूपये खर्च केले. तरूणी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कॅनडाला गेली सुद्धा. पण कॅनडाला पोहोचताच तिचा रंग बदलला. दहा दिवसांनी जेव्हा पतीने तिला फोन केला तर त्याला ती म्हणाली की, तिला परत फोन केला तर ती त्याच्याविरोधात केस करेल. फसवणुकीच्या या प्रकरणात तरूणाने पत्नी, सासू, सासरे, मुलीचे मामा, मामी, मामे बहीण विरोधात केस दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणी पीडित तरूणाने मोगातील पोलीस स्टेशनमध्ये ११ मार्च २०२० ला लिखित तक्रार दिली होती. पोलिसांनी घटनेच्या तब्बल ११ महिन्यांनंतर एफआयआर दाखल केला आहे. उशीरा केस दाखल झाल्याने आरोपींना पोलीस पकडू शकले नाही. पत्नी सोडून सर्व आरोपी देशातच आहेत. पोलीस अधिकारी प्रीतम सिंह म्हणाले की, दविंदर सिंह याच लग्न लुधियानातील मंडियानी गावातील हरजशनप्रीत कौरसोबत ऑगस्ट २०१८ मध्ये झालं होतं. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डच्या मदतीने पतीला जिवंत जाळलं, मित्रानेच फोन करून विटांच्या भट्टीवर बोलवलं होतं...)
देण्यात आलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे की, मावशी-काकाजींनी त्यांच्या गावातील हरजशनप्रीत कौरबाबत सांगितलं होतं. ती आयलेट्स पास झाली होती आणि तिला पुढील शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. जर त्याने लग्न केलं तर त्यानेही परदेशात सेटल व्हावं. त्याला लग्नापासून ते परदेशात पाठवण्याचा खर्च उचलावा लागेल. देविंदरने लग्नापासून ते पत्नीला कॅनडाला पाठवण्यासाठी एकूण ३१ लाख रूपये खर्च केले.(हे पण वाचा : खरी ओळख लपवून ३१ वर्षीय महिलेचं १४ महिने लैंगिक शोषण, २३ वर्षीय आरोपीला अटक...)
देविंदर म्हणाला की पत्नीला फोन केल्यावर जेव्हा तो सासरी गेला तेव्हा तिथेही त्याच्यासोबत चांगला व्यवहार करण्यात आला नाही. याप्रकरणी पोलिसांनी ११ महिन्यांनंतर हरजशनप्रीत कौर, तिचे वडील सुखविंदर सिंह, हरप्रीत कौर, हरजीत सिंह सर्बजीत कौर आणि अमनजोत कौर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.