पत्नी गावातील तरुणासोबत हॉटेलमध्ये या अवस्थेत सापडली, अन् नंतर जे झाले ते भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:14 PM2022-12-02T21:14:52+5:302022-12-02T21:18:34+5:30

गुलावठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये पतीने पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, त्या पतीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

wife caught in objectionable condition with another man in bulandshahr s gulawathi | पत्नी गावातील तरुणासोबत हॉटेलमध्ये या अवस्थेत सापडली, अन् नंतर जे झाले ते भयंकर...

पत्नी गावातील तरुणासोबत हॉटेलमध्ये या अवस्थेत सापडली, अन् नंतर जे झाले ते भयंकर...

googlenewsNext

गुलावठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये पतीने पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, त्या पतीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे, त्यानंतर त्यांनी एसएसपींकडे तक्रार करून न्याय मागितला. बीबी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाने एसएसपींना तक्रार पत्र दिले आङे. 

या पत्रात त्याने 2017 मध्ये गावातील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत चालले, नंतर त्याच्या पत्नीचे गावातील एका तरुणासोबत अनेतिक संबंध होते, असं म्हटले आहे. 

या संबंधाला विरोध केल्याने पत्नीने पतीविरुद्ध न्यायालयात दोन खटले दाखल केले. पत्नी आपल्या मुलाला सोबत घेऊन माहेरी गेली. पत्नी आणि मुलाला परत आणण्यासाठी या तरुणाने न्यायालयात दादही मागितली होती.

पत्नीने येण्यास नकार देत प्रियकरासोबत राहण्याचा आग्रह धरल्याचा आरोप आहे. आता पत्नीही आपल्या मुलाची काळजी घेत नसल्याचा आरोप पतीने केला आहे.

29 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील गुलावठी येथील एका हॉटेलमध्ये पत्नी तरुणासोबत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे पतीने म्हटले आहे. या प्रकरणी तक्रार आता एसएसपींकडे केली आहे.त्याने पत्नीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

Web Title: wife caught in objectionable condition with another man in bulandshahr s gulawathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.