पत्नीने पतीचे दुष्कृत्य आणले उघडकीस; DSP ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:33 PM2021-06-05T18:33:10+5:302021-06-05T18:35:18+5:30

Rape Case : मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गयाचे तत्कालीन डीएसपी मुख्यालय कमलाकांत प्रसाद यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The wife exposed her husband's misdeeds; DSP rapes minor girl | पत्नीने पतीचे दुष्कृत्य आणले उघडकीस; DSP ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

पत्नीने पतीचे दुष्कृत्य आणले उघडकीस; DSP ने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Next
ठळक मुद्देमिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा आरोप आहे की २०१७ मध्ये दसऱ्याच्या वेळी तिच्यावर इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील तत्कालीन डीएसपीने बलात्कार केला होता.

पोलिस सर्वसाधारणपणे जनतेचे रक्षक मानले जातात. कोणताही वाद, चोरी किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा असला तरी लोक न्यायासाठी पोलिसांकडे जातात. परंतु संरक्षक करणारा पोलीस भक्षक झाला तर काय? बिहारमधील गया येथून एक अतिशय भयावह प्रकरण समोर आले आहे. नुकताच गयामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आश्चर्य म्हणजे मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) वर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गयाचे तत्कालीन डीएसपी मुख्यालय कमलाकांत प्रसाद यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा आरोप आहे की २०१७ मध्ये दसऱ्याच्या वेळी तिच्यावर इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील तत्कालीन डीएसपीने बलात्कार केला होता. याप्रकरणी डीएसपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कोर्टाचे विशेष न्यायाधीश नीरज कुमार यांच्या सूचनेवरून मंगळवारी पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. ज्यामध्ये पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या बलात्काराबद्दल सांगत तत्कालीन डीएसपी कमलाकांत प्रसाद यांच्यावरील आरोपाची माहिती दिली आहे.

या प्रकरणाच्या तपासामध्ये सीआयडीचा सहभाग

या प्रकरणाची माहिती उघड झाल्यानंतर सीआयडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा एसएसपी आदित्य कुमार म्हणाले की, पोलीस मुख्यालय व सीआयडीच्या आदेशानुसार माजी डीएसपी कमलाकांत प्रसाद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयडी पीडितेच्या जबाबाच्या आधारे कारवाई करत आहे. एफआयआरनुसार मुलीची तत्कालीन डीएसपी कमलाकांत यांच्या निवासस्थानी वास्तव्य असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे डीएसपीच्या या दुष्कृत्यावरून इतर कोणीही नाही, तर त्याची पत्नी तनुजाने आवाज उठविला आहे आणि घटना उघडकीस आणली आहे.

 

पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदविला
सध्या आरोपी डीएसपी पाटण्यात कार्यरत आहेत. पीडित मुलगी गयाच्या इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. पीडितेच्या तक्रारीवरून महिला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पीडित महिलेला न्यायदंडाधिकारी स्वाती सिंह यांच्या न्यायालयात हजर केले असता तिने तिचे निवेदन नोंदवले. कमलाकांत प्रसाद यांनी पीडितेसमवेत ही घटना घडवून आणली असता तो पोलिस उपअधीक्षक मुख्यालय गया येथे कार्यरत होता. इतकेच नव्हे तर या काळात जिल्ह्यातील मानवी तस्करी रोखण्याचे कामही त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.

Web Title: The wife exposed her husband's misdeeds; DSP rapes minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.