पत्नीसोबत जबरदस्ती ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध, आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 14:46 IST2021-10-22T14:45:56+5:302021-10-22T14:46:28+5:30
पोलिसांनुसार, नंदनवनची राहणारी महिला जानेवारीमध्ये आरोपीला भिलाईमध्ये भेटली होती. तो गोंदियाचा राहणारा होता. नंतर दोघांनी दुर्गमध्ये लग्न केलं.

पत्नीसोबत जबरदस्ती ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध, आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर केले शेअर
२७ वर्षीय एका व्यक्तीने कथितपणे आपल्या २१ वर्षीय पत्नीला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तिला मारहाण केली आणि तिचे आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर पत्नीने नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पत्नीने असाही आरोप केला आहे की, आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्याआधी एक लग्न केलं होतं, ज्याबाबत त्याने तिला सांगितलं नाही.
पोलिसांनुसार, नंदनवनची राहणारी महिला जानेवारीमध्ये आरोपीला भिलाईमध्ये भेटली होती. तो गोंदियाचा राहणारा होता. नंतर दोघांनी दुर्गमध्ये लग्न केलं. नंतर महिलेला समजलं की, तिच्या पतीने तिला त्याच्या पहिल्या लग्नाबाबत सांगितलं नाही. इतकंच काय तर आधीच्या लग्नातून तिला एक मुलगीही आहे. जेव्हा महिलेने पतीला याबाबत विचारले तेव्हा त्याने कथितपणे तिला त्रास देणे सुरू केले होते आणि त्याने तिला नंदनवनला सोडलं.
जेव्हा महिला भिलाईला परतली तेव्हा पतीने कथितपणे तिला मारहाण केली आणि जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार १९ ऑक्टोबरला ती नागपूरला परत आली. तेव्हा तिने नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये पती विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
अशाप्रकारे या प्रकरणात गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या ४८ वर्षीय पती विरोधात अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती.