सेक्ससाठी १५ दिवसांपासून पत्नी देत होती नकार; पतीने उचलले धक्कादायक पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 09:17 PM2021-05-27T21:17:12+5:302021-05-27T21:20:28+5:30

Murder Case : पत्नीची हत्या केल्यानंतर मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्यांने त्यांना कालव्यात फेकले.

The wife had been refusing for sex for 15 days; The husband took a shocking step | सेक्ससाठी १५ दिवसांपासून पत्नी देत होती नकार; पतीने उचलले धक्कादायक पाऊल 

सेक्ससाठी १५ दिवसांपासून पत्नी देत होती नकार; पतीने उचलले धक्कादायक पाऊल 

googlenewsNext
ठळक मुद्देमृत पत्नीचे नाव डोली असून सानिया (५), वंश (३) आणि अर्शिता (१८ महिने) अशी तीन मुलांची नावे आहेत

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसिडी गावात एका ३५ वर्षीय व्यक्तीनी आपल्या पत्नीची हत्या केली आणि स्वतःच्या मुलांना कालव्यात फेकून दिले. पत्नीने गेल्या १५ दिवसांपासून शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतप्त पतीने गोळ्या घालून पत्नीची हत्या केली. पप्पू असे आरोपी पतीचे नाव आहे. मृत पत्नीचे नाव डोली असून सानिया (५), वंश (३) आणि अर्शिता (१८ महिने) अशी तीन मुलांची नावे आहेत.

या घटनेनंतर तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर पतीने सांगितले, पत्नी गेल्या १५ दिवसांपासून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. त्यामुळे मी रात्रीचं ठरवले सकाळी पत्नीने ऐकलं नाही तर तिची हत्या करणार. त्यानुसार  पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर त्याने सकाळी पत्नीच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या केली.

पत्नीची हत्या केल्यानंतर मुलांना कोण सांभाळणार हा विचार करून त्यांने त्यांना कालव्यात फेकले. पत्नीची हत्या केल्यानंतर तो तीन मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. तीनही मुलांना जिवंतपणे कालव्यात फेकून दिले. १० वर्षांपूर्वी पप्पूच्या मोठ्या भावाशी तिचे लग्न झाले होते. मात्र, काही काळाने पतीचे निधन झाल्याने तिचे पप्पुशी दुसरे लग्न केले.  

या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी पप्पूला अटक केली आणि कालव्यातून मुलांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: The wife had been refusing for sex for 15 days; The husband took a shocking step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.