Video : थरारक! पत्नीने साडूच्या मदतीने केला पतीवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 06:03 PM2019-07-03T18:03:26+5:302019-07-03T18:04:37+5:30
ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मुंबई - जीटीबी येथे आरबी ३ कॉलनीनजीक कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी पीडित पतीच्या पत्नीला आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. पत्नी सरण्या दिनेश नाडर (२७) आणि बहीण कल्याणी डेव्हिड नाडर (२३) अशी अटक आरोपींची नावं आहेत.
कौटुंबिक वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पत्नी सरण्याने पती दिनेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर बहिणीच्या नवऱ्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेशला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी पत्नी आणि पत्नीच्या बहिणीस बेड्या ठोकल्या आहेत. तर बहिणीचा नवरा डेव्हिड आणि सरण्याचे वडील फरार आहेत. याबाबत सायन पोलीस अधिक तपास करत आहेत.