पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 12:02 PM2018-07-20T12:02:42+5:302018-07-20T12:03:46+5:30

पतीचा हा बाहेरख्यालीपणा पत्नीस समजला तर मात्र त्याची खैर नसते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

wife hits her husband | पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई 

पतीच्या हातावर पाहिला गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू, पत्नीने केली धुलाई 

googlenewsNext

कोइंबतूर - या जगात विवाहानंतरही रंगेलपणा करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी नाही. मात्र पतीचा हा बाहेरख्यालीपणा पत्नीस समजला तर मात्र त्याची खैर नसते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर पाच दिवसांनी पतीच्या हातावर गर्लफ्रेंडच्या नावाचा टॅटू पाहिल्यावर खवळलेल्या पत्नीने पतीची धुलाई केली. या प्रकारामुळे भेदरलेल्या पतीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीच्या रौद्रावतारापासून तो स्वत:चा बचाव करू शकला नाही.  
हा प्रकार तामिळनाडूमधील किनाथुडावू येथे घडला असून, येथील 22 वर्षिय नवविवाहिता आपल्या पतीसोबत बस स्टॉपवर बसली होती. तिथेच तिची नजर आपल्या पतीच्या हातावर पडली. त्याच्या हातावर एका मुलीच्या नावाचा टॅटू गोंदलेला होता. हे नाव पतीच्या गर्लफ्रेंडचे होते.  हा टॅटू पाहून पत्नीचा राज अनावर झाला. ती संतापली. रागाच्या भारात आरडाओरड करत तिने पतीला सर्वांसमक्ष मारहाण करण्यास सुरुवात केली. 
 हा प्रकार पाहत असलेल्या लोकांपैकी काही जण या दोघांनाही तिथून जवळ असलेल्या साईबाबा कॉलनी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे पोलिसांनी दोघांनाही खडसावत सार्वजनिक ठिकाणी भांडण न करण्याची सूचना केली. तसेच पोलिसांनी सदर महिलेस किनाथुकडावू पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. सदर महिलेचा हा दुसरा विवाह आहे. तिने या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता.  

Web Title: wife hits her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.