पत्नी रुग्णालयात, घरात पती अन् मुलाची आत्महत्या; उपचारासाठी पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:13 AM2021-03-12T01:13:31+5:302021-03-12T01:14:10+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. (Jalgaon)

Wife in hospital, husband and son commit suicide at home in jalgaon | पत्नी रुग्णालयात, घरात पती अन् मुलाची आत्महत्या; उपचारासाठी पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

पत्नी रुग्णालयात, घरात पती अन् मुलाची आत्महत्या; उपचारासाठी पैसे नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

Next

जळगाव: दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये खर्च केले. यानंतरही आणखी पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने नैराश्यात आलेल्या दीपक रतीलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४), या पिता-पूत्राने राहत्या घरातच विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या आदर्श नगरमध्ये घडली आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता ही घटना उघडकीस आली. (Wife in hospital, husband and son commit suicide at home in Jalgaon)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतीमंद होता. मुलगी रुपाली विवाहित असून नंदुरबारला सासरी असते. पत्नी श्रद्धा यांना निमोनिया व इतर आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले तरी प्रक्रुतीत सुधारणा होत नाही. हा दवाखान्याचा खर्च जावाई रुपेश सोनार यांनी केला. आता अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने दीपक सोनार नैराश्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे.

अशी उघड झाली घटना -
मुलगी व जावई रुग्णालयात असताना दीपक सोनार यांना फोन करत होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जावई घरी आले असता त्यांना सासरे व परेश मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची शेजारी चर्चा होताच मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तातडीने रामानंद नगर पोलिसांना कळविले. त्यानंतर रुग्णवाहिका आणून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. 

दरम्यान रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश डोलारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला परंतु दोघांनी नेमके कोणते विषय घेतले हे समजू शकले नाही.

कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह
दीपक सोनार यांच्या पत्नी श्रद्धा या अपेक्स या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत त्यांना कोरोना असल्याचे सांगितले जात होते. याबाबत खात्री करण्यासाठी रुग्णालयाचे डॉ. समीर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता श्रद्धा यांची अॅटीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, मात्र शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्ट घेतली जाणार होती. निमोनिया गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
 

Web Title: Wife in hospital, husband and son commit suicide at home in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.