गावी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला पेटविले; कोंढव्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:04 PM2020-03-19T19:04:02+5:302020-03-19T19:07:26+5:30

महिला ६५ टक्के भाजली, प्रकृती चिंताजनक 

Wife injured by husband due to refusing go to town in the kondhava | गावी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला पेटविले; कोंढव्यातील घटना 

गावी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला पेटविले; कोंढव्यातील घटना 

Next
ठळक मुद्देगावी जाण्यावरून त्यांच्यात झाली भांडणे

पुणे : गावी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत महिला ६५ टक्के भाजली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात १७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. 
कोंढवापोलिसांनी हरिदास गंगाधार जोगदंड (वय २५, रा. गोकुळनगर, कोंढवा, मूळ गाव गौर, ता. पूर्णा, जि परभणी) याला अटक केली आहे. चांगुणा हरिदास जोगदंड (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगदंड पती-पत्नी मूळचे परभणीचे आहेत. हरिदास हा एका पेट्रोल पंपावर काम करतो, तर चांगुणा या मॉलमध्ये नोकरी करतात. गावी जाण्यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडणे झाली. पती तिला गावी जाऊ असे म्हणत होता,तर पत्नी त्याला नकार देत होती. त्यातून चिडून हरिदास याने बाटलीतील रॉकेल तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. त्यात चांगुणा ६५ टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Wife injured by husband due to refusing go to town in the kondhava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.