पाच लाखांसाठी पत्नीला घरातून हाकलून दिले; सात जणांवर गुन्हा दाखल

By रवींद्र देशमुख | Published: October 10, 2023 06:06 PM2023-10-10T18:06:25+5:302023-10-10T18:06:46+5:30

याप्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यासह दोघांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wife kicked out for five lakhs; A case has been registered against seven people | पाच लाखांसाठी पत्नीला घरातून हाकलून दिले; सात जणांवर गुन्हा दाखल

पाच लाखांसाठी पत्नीला घरातून हाकलून दिले; सात जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : लग्नात मानपान केला नाही म्हणून सतत शारीरिक व मानसिक त्रास देत माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये, तरच तुला नांदवितो, अशी धमकी देत घरातून हाकलून दिले. याप्रकरणी पती, सासू, सासरा, नणंद यांच्यासह दोघांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजश्री शिवपुत्र बनसोडे (वय ३८, रा. आण्णा कॉलनी, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर) हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती शिवपुत्र बनसोडे, सासरे सिद्धप्पा बनसोडे, सासू सरूबाई बनसोडे, पांडुरंग बनसोडे, संगीता बनसोडे, ललिता निजाप्पा गायकवाड (सर्वजण रा. आदित्यनगर, नवीन आरटीओजवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजश्री व शिवपुत्र यांचा सात ते आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला. 

विवाहानंतर सुखी संसारात किरकोळ कारणावरून वाद होत होता. दरम्यान, किरकोळ कारणावरून भांडण करून लग्नात मानपान केला नाही म्हणून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पती शिवपुत्र याने शिवीगाळ व मारहाण केली. शिवाय माहेरून पाच लाख रूपये आणले तरच तुला नांदवितो असे म्हणून विवाहित महिलेस घरातून हाकलून दिले. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.

मुलगी, पत्नीस दिली जीवे मारण्याची धमकी
पती शिवपुत्र याने शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादी राजश्री व मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. लग्नानंतर सात ते आठ महिन्यांतच पती-पत्नीमधील वाद वाढत चालल्याने विवाहित महिलेने पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife kicked out for five lakhs; A case has been registered against seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.