दुसरं लग्न केल्यावर तरूणीचं अपहरण, पोलिसांनी पहिल्या पतीला धरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:46 PM2021-09-11T12:46:09+5:302021-09-11T12:48:45+5:30
तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.
छत्तीसगडच्या टुकराना गावात ८ सप्टेंबरला रात्री उशीरा घरात घुसून एका तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली. पोलिसांनी केवळ १२ तासात प्रकरणाचा खुलासा केला. तरूणीचं अपहरण करणारा दुसरा कुणी नसून तिचा पहिला पती निघाला. या कृत्यात तरूणीच्या पहिल्या पतीसोबत आणखी चार लोकांचा समावेश होता.
काय आहे भानगड?
दोन महिन्यांपूर्वी २४ वर्षीय मनीषाने अर्जुन नट याच्यासोबतच दुसरं लग्न केलं होतं. ८ सप्टेंबरला रात्री उशीरा एका कारमध्ये काही लोक मनीषाच्या सासरी पोहोचले. तिचे सासरे आणि पतीला त्यांनी मारहाण करत मनीषाला जबरदस्ती कारमध्ये बसवलं. पती आणि सासऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. कुटुंबियांच्या चौकशीच्या आधारावर पोलिसांना समजलं की, तरूणीचा पहिला पती मांगीलाल नट त्याच्या साथीदारांसोबत तिला घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी मांगीलालच्या घरावर लक्ष ठेवलं. पोलिसांनी पाहून मांगीलाल पळून जात होता. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने तरूणीचा पत्ता सांगितला. (हे पण वाचा : आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं)
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तरूणीची सुटका केली. त्यानंतर मांगीलालसोबतच नारायण, रामबाबू आणि धीरज यांनाही अटक केली. तसेच अपहरणासाठी वापरलेलं वाहनही ताब्यात घेतलं.
का केलं अपहरण?
तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं. तरूणीने दुसरं लग्न केल्याने पहिला पती संतापला आणि तिच्यासोबत भांडण करू लागला. पहिल्या भांडणावेळी तरूणीच्या वडिलांनी मांगीलाल याला ३० हजार रूपये दिले होते. तरूणीचं दुसरं लग्न होताच मांगीलाल तरूणीच्या दुसऱ्या पतीकडे आणखी पैशांची मागणी करत होता. ते पैसे न मिळाल्याने त्याने तरूणीचं अपहरण केलं. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.