पत्नीला प्रियकर हवा होता तर मुलाला पैसे, दोघांनी मिळून केली हत्या आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:05 PM2023-02-20T19:05:49+5:302023-02-20T19:06:21+5:30
संशयाच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की, नाथूरामची दुसरी पत्नी रनियाचे त्याच गावात राहणाऱ्या बहिणीच्या दीरासोबत अनौतिक संबंध होते.
राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पत्नीने आपल्या प्रियकराला सुपारी देऊन पतीची हत्या केली. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यात महिलेचा मुलगाही सामिल होता. पोलिसांनी हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
ही घटना अजान गावातील आहे. इथे 15 फेब्रुवारीला नाथूरामचा मृतदेह शेतात पडलेला सापडला. त्याची पत्नी लपून त्याचं अंत्यसंस्कार करणार होती. पण घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यानंतर महिलेच्या कारनाम्याचा खुलासा झाला.
संशयाच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा समजलं की, नाथूरामची दुसरी पत्नी रनियाचे त्याच गावात राहणाऱ्या बहिणीच्या दीरासोबत अनौतिक संबंध होते. त्यांच्या नात्यात नाथूराम अडसर ठरत होता. तिकड नाथूरामच्या पहिल्या पत्नीचा मुलगा दीपक याला जमीन विकायची होती. पण त्याचे वडील त्याला नकार देत होते. यावरून तो नाराज होता. रनियाने आपल्या प्लानमध्ये त्याचा वापर केला.
पोलिसांनुसार, रनियाने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्लान केला. पतीला मारून तिला दीरासोबत अनैतिक संबंध सुरूच ठेवायचे होते. दुसरीकडे दीपक विचार करत होता की, वडिलांच्या मृत्यूनंतर जमीन विकून तो मजा करेल. तेव्हाच रनियाने पतीला मारहण्यासाठी प्रियकराला 2 लाख रूपयांचा सौदा केला.
प्लाननुसार, पत्नीचा प्रियकर पतीला काहीतरी कारण देत शेतात घेऊन गेला आणि त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकला. त्यानंतर दीपकला याची माहिती दिली. दीपकने हे रनियाला सांगितलं. पुरावे मिटवण्यासाठी आरोपींनी त्याचा अंत्यसंस्कार करण्याचा प्लान केला. पण सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी सांगितलं की, अजान गावात राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. चौकशीतून समोर आलं की, त्याची दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीच्या मुलाने मिळून त्याची हत्या केली. याबाबत तिघांना अटक करण्यात आली आहे.