सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पतीची हत्या, मित्रासोबत रचला भयानक कट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:36 PM2022-12-20T20:36:06+5:302022-12-20T20:36:22+5:30

Crime News : पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा समोर आला.

wife killed husband in greed of government job in dhanbad | सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पतीची हत्या, मित्रासोबत रचला भयानक कट!

सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पतीची हत्या, मित्रासोबत रचला भयानक कट!

googlenewsNext

नवी दिल्ली : पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र आणि विश्वासाने भरलेले असते, पण झारखंडच्या धनबादमध्ये एका पत्नीने सरकारी नोकरीच्या लालसेपोटी आपल्या मित्रासह आधी रेल्वे कर्मचारी पतीचा कट रचून खून केला. त्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक खुलासा समोर आला.

रेल्वे कर्मचारी रामचंद्र यादव यांचे मारेकरी दुसरे तिसरे कोणी नसून त्यांची पत्नी जीरा देवी आणि तिचा मित्र पिंटू कुमार साव आहेत. या दोघांनाही पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवले आहे. धनबाद जिल्हा डीएसपी मुख्यालयाने बरवाअड्डा पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत रेल्वे कर्मचारी रामचंद्र यादव यांच्या हत्येप्रकरणी खुलासा करताना सांगितले की, रेल्वे कर्मचारी रामचंद्र यादव यांची हत्या अनुकंपा तत्त्वावर नोकरीच्या लालसेपोटी त्यांच्या पत्नीने आपल्या मित्र पिंटू कुमार साव यांच्या मदतीने केली.

दरम्यान, 11 डिसेंबर रोजी रामचंद्र यादव ड्युटी करण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा पत्नीने मित्र पिंटू कुमार साव याला याबाबत माहिती दिली. यानंतर पिंटू कुमार साव याने रामचंद्र यादव यांना दारू पिण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर धनबाद येथील बरवाअड्डा येथे बोलावून रात्री जयनगर जोरिया येथे दारू पाजल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून मृतदेह झुडपात फेकून दिला. यानंतर 14 डिसेंबर रोजी मृत रामचंद्र यादव यांच्या पत्नीने बँक मोर खानामध्ये जाऊन पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

रेल्वे कर्मचारी बेपत्ता झाल्याची नोंद होताच 17 डिसेंबर रोजी पोलिसांनी रामचंद्र यादव यांचा मृतदेह जयनगर जोरियाच्या झुडपातून बाहेर काढला. पोलिसांना रेल्वे कर्मचारी रामचंद्र यादव यांच्या पत्नीवर संशय आल्यानंतर तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स  काढले. यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, महिलेला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवून पिंटू कुमार साव याच्यासोबत राहायचे होते, त्यामुळेच तिने रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीची हत्या केली. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

Web Title: wife killed husband in greed of government job in dhanbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.