भाच्यासोबतचे अनैतिक संबंध पतीला समजले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून व्हॅलेंटाईन डे ला पतीची केली हत्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 10:33 AM2021-02-20T10:33:58+5:302021-02-20T10:34:25+5:30
Death Gift on Valentine Day husband Murdered by Wife : भाच्यासोबतचे अनैतिक संबंध (Extra Marital Affair) पतीला समजले होते. त्यावरून दोघांमध्ये भांडणं होत होती. अशात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केेली.
Wife Murder Husband : राजस्थानच्या(Rajasthan) अलवरमध्ये(Alwar) पोलिसांनी एका हत्येच्या प्रकरणाचा खुलासा केला असून एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी महिलेने तिच्या ओढणीने पतीची गळा आवळून हत्या(Murder) केली आणि यावेळी तिचा प्रियकर पतीला पकडून होता.
पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीचं नाव कमल सिंह असून तो यूपीतील मथुरा येथील राहणार आहे. कमलची हत्या १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली होती. हत्येनंतर दोन्ही आरोपी त्याचा मृतदेह रात्री १ वाजता भिवाडी सेक्टरमध्ये फेकून पळाले होते. (हे पण वाचा : धक्कादायक! आई वडिलांपासून वेगळे राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीचा खून करुन पतीचीही आत्महत्या)
पोलिसांनी तपास करताना आजूबाजूचे सीसीटीव्ह फुटेज चेक केले. तेव्हा त्यांना समजलं की, दोन लोक मृतदेह बाइकवर घेऊन जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीची कसून चौकशी केली. आधी तिने पोलिसांना आणि नातेवाईकांना सगळं खोटं सांगितलं. पण जेव्हा पोलिसांनी तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तेव्हा तिने सगळं सांगितलं. तिने हे मान्य केलं की, प्रियकरासोबत मिळून तिने पतीची हत्या केली. (हे पण वाचा : भयंकर! लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची धारदार चाकूने केली हत्या;वडील जखमी)
भिवाडीचे पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, कमल सिंह प्रधान कॉलनीमध्ये पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. कमल सिंह हा उत्तर प्रदेशच्या बरसानाजवळील उमराया गावात राहणारा होता. कमलची पत्नी जमुनाचे तिचा भाचा असलेल्या मोहनसोबत अनैतिक संबंध होते. कमलला दोघांच्या संबंधाची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. व्हॅलेंटाईन डे ला तिचा प्रियकर घरी आला आणि पुन्हा भांडण झालं. यावेळी दोघांनी गळा आवळून कमलची हत्या केली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले की, जमुना देवी तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. तिथे तिची भेट मोहनसोबत झाली आणि दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले. ती मोहनसोबत फोनवर नेहमी बोलत होती. यावरून तिच्यात आणि पतीमध्ये भांडणं होत होती. अशात कमल सिंह मदन मोहनकडून २ लाख रूपये मागत होता. २ लाख मिळत नसल्याचे पाहून कमल त्याला पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी देत होता. यावरून भांडण सुरू झालं आणि दोघांनी मिळून कमलची हत्या केली.