भांडणात पत्नीची हत्या; पती सदोष मनुष्यवधाचा दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 08:14 AM2023-11-25T08:14:34+5:302023-11-25T08:14:43+5:30
पतीने कोणताही फायदा घेण्यासाठी क्रूर रीतीने तो वागला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १४ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा भोसकून खून केला होता. आता येथील कोर्टाने त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. यासोबतच आरोपीने हा गुन्हा क्रूरपणे केला नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
कोर्टाने म्हटले की, पीडिता आणि पतीमध्ये भांडण झाले होते. तिथे पत्नीने आरोपीवर हल्ला केला आणि त्यानंतर पतीने तिच्यावर चाकूने वार केले. सहायक सत्र न्यायाधीश नवजित बुद्धीराजा म्हणाले की, दोघांमधील हे भांडण पूर्वनियोजन नव्हते किंवा पतीने कोणताही फायदा घेण्यासाठी क्रूर रीतीने तो वागला नाही.
नेमके काय झाले होते ?
१६ ऑगस्ट २००९ रोजी पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपी अलमंथाच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू असताना कोर्टाने म्हटले की,
दाम्पत्याच्या दोन मुलांच्या जबाबानुसार, आरोपी आणि त्याची पत्नी बेशुद्धावस्थेत, रक्ताने माखलेले आढळले आणि त्यांना रुग्णालयात
नेण्यात आले.
कोर्ट म्हणाले...
nकोर्टाने सांगितले की, दोघांमध्ये वाद झाला होता आणि यासाठी कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. घटनेवेळी तणाव खूप जास्त असावा आणि आरोपीलाही चाकूने जखमी केले असावे. आरोपीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने प्रत्युत्तर
म्हणून पीडितेवर चाकूने वार
केले असावेत.
nआरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले असले तरी, तो आयपीसीच्या कलम ३०४ भाग १ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी आढळला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढे सुरूच राहणार आहे.
स्त्रीच्या कपाळावर जबरदस्तीने भांगेत कुंकू भरणे हे हिंदू कायद्यानुसार विवाह नाही. हिंदू विवाह स्वैच्छिक असल्याशिवाय आणि ‘सप्तपदी’ (वधू-वरांद्वारे पवित्र अग्निभोवती प्रदक्षिणा घालणे) सोबत होत नाही तोपर्यंत वैध नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. बजंथ्री आणि न्यायमूर्ती अरुण कुमार झा यांनी सक्तीच्या विवाहाच्या प्रकरणावर सुनावणी करताना ही बाब स्पष्ट केली. नवादा जिल्ह्यातील एका जवानाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे लग्न अवैध ठरवले. याचिकाकर्ते रविकांत हे लष्करात सिग्नलमन होते.
१० वर्षांपूर्वी लखीसराय येथे बंदुकीच्या धाकावर त्यांचा बळजबरीने विवाह करण्यात आला होता. त्यांना वधूच्या कपळावर जबरदस्तीने कुंकू लावण्याची सक्ती करण्यात आली होती. यामुळे ते कोर्टात गेले होते.