पत्नीचं शेजाऱ्यावर जडलं प्रेम, पतीनं विरोध केला म्हणून पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल; पाहून सर्वच चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:30 PM2022-10-04T17:30:12+5:302022-10-04T17:30:56+5:30
बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये थरारक घटना घडली आहे. पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
मुझफ्फरपूर-
बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये थरारक घटना घडली आहे. पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कुढनी ठाणे हद्दीतील अख्तियापूर परिया गावात घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार परिया गावातील रहिवासी संजय झा याचं लग्न जुली देवी हिच्यासोबत झालं होतं. लग्नानंतरचे काही दिवस सारंकाही आलबेल होतं. पण यातच जुली देवी हिचं गावातील एका तरुणावर प्रेम जडलं आणि दोघं एकमेकांना गुपचूप भेटू लागले. एकेदिवशी पती संजय झा याला पत्नीच्या या प्रकरणाबद्दलची माहिती मिळाली आणि त्यानं स्पष्ट शब्दांत पत्नीला बजावलं. तसंच सारंकाही थांबवण्यास सांगितलं. पतीकडून वारंवार विरोध होत असूनही पत्नीनं काही माघार घेतली नाही. तिनं प्रियकराला भेटणं सुरूच ठेवलं. यामुळे दाम्पत्यामध्ये दररोज भांडणं होऊ लागली. याच भांडणाचं रुपांतर एकमेकांविरोधातील द्वेषात झालं आणि पत्नीनं थेट स्वत:च्याच पतीला जीवे मारण्याचा कट रचला.
हत्येचा कट रचला
जुली देवीचा पती संजय झा घराच्या दरवाजाजवळ एकटाच झोपायचा. याचाच फायदा उचलत सोमवारी रात्री पत्नीनं प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर दोघांनी मिळून पती संजय झा याचा खून करण्याचा ठरवलं. दरवाजाच्या जवळच झोपलेल्या संजय झा याचा चाकूनं गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर दोघंही आपापल्या घरी गेले. जेव्हा सकाळी गावकऱ्यांनी दरवाजाच्या बाहेरच संजय झा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि धक्काच बसला. गावकऱ्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे अधिक्षक अरविंद पासवान घटनास्थळी पोहोचले आणि गावकऱ्यांची समजून घालून मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
पोलीस अधिकारी अरविंद पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार परिया गावातील रहिवासी संजय झा यांची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून तपासणीनंतरच पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.