पहिल्या प्रियकराच्या साथीने 'ती'ने पतीला संपवलं, दुसरा प्रियकर शोधला अन् भलतंच घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 06:57 PM2024-03-13T18:57:56+5:302024-03-13T18:58:22+5:30

पोलीसांनी प्रकरणाचा तपास केल्यावर वेगळीच गोष्ट समोर आली

Wife murdered husband with help of boyfriend then second bf killed the lady murder mystery in UP | पहिल्या प्रियकराच्या साथीने 'ती'ने पतीला संपवलं, दुसरा प्रियकर शोधला अन् भलतंच घडलं!

पहिल्या प्रियकराच्या साथीने 'ती'ने पतीला संपवलं, दुसरा प्रियकर शोधला अन् भलतंच घडलं!

Murder Mystery: उत्तर प्रदेशात एक विचित्र घटना समोर आली. एका महिलेच्या पतीचा खून झाल्याची घटना समोर आली. पत्नीने आपल्या प्रियकराच्या साथीने त्याला ठार केले असल्याची चर्चा रंगली होती. या घटनेनंतर पोलीस तपासात तो प्रियकर दोषी आढळला. त्यामुळे प्रियकराची तुरूंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर महिलेने दुसरा प्रियकर शोधला. पण त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक होतं. 

पहिल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून

सीओ राहुल पांडे यांनी सांगितले की, महिलेने तिचा आधीचा प्रियकर लवकुश श्रीवास्तवसोबत ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पती राजीव श्रीवास्तवची हत्या केली होती. त्या घटनेनंतर तिचा पहिला प्रियकर लवकुश तुरुंगात शिक्षा भोगू लागला. मग ममताने नंदू यादवशी प्रेमप्रकरण जुळवले. नंदू हा तिचा दुसरा प्रियकर होता.

पहिला प्रियकर तुरुंगात, दुसऱ्याशी जुळवलं सूत अन् मग...

अधिक तपासात महिलेचा प्रियकर नंदू यादवपर्यंत पोलीस पोहोचले. चौकशीत प्रियकराने सांगितले की, ममता त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. नंदू आधीच विवाहित असल्याने तो या नात्यासाठी तयार नव्हता. ममताच्या सततच्या दबावाला कंटाळून नंदूने ममताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पैशांच्या मुद्द्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. यानंतर त्याने ममताला भेटण्याच्या बहाण्याने रॉबर्टसगंज येथे बोलावून तिच्या ओढणीने गळा दाबून खून केला आणि मृतदेह फेकून देऊन तो पळून गेला. ममता त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. याच कारणावरून त्याने ममताची हत्या केली असे पोलीस तपासांत समोर आले.

Web Title: Wife murdered husband with help of boyfriend then second bf killed the lady murder mystery in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.