अंडा करीवरून पती-पत्नीत झालेले कडाक्याचे भांडण बेतले ३ वर्षाच्या मुलावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:09 PM2020-05-11T20:09:55+5:302020-05-11T20:15:43+5:30
ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपी सुभाष बंजारा नगला गावात मद्यधुंद अवस्थेतून घरी परतला आणि पत्नीला अंडी करी तयार करण्यास सांगितले.
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - 11 मे रोजी बायकोने अंडी करी शिजवण्यास नकार दिल्याने तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या मद्यपी वडिलांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याची हत्या झाली.
ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपी सुभाष बंजारा नगला गावात मद्यधुंद अवस्थेतून घरी परतला आणि पत्नीला अंडी करी तयार करण्यास सांगितले. मात्र, पत्नीने नकार देताना बंजाराने सुरुवातीला आपल्या पत्नीला मारहाण केली. नंतर त्याने आपल्या मुलावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले. मुलाला खुर्जा परिसरातील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला.
खुर्जा कोतवालीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, घटनेनंतर बंजारा आपल्या घरून पळून गेला. त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याविरोधात कलम 304 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे
Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक