पत्नीने थोड्या वेळात पोहोचण्याचे कळविले; पण नग्न अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 08:38 PM2020-03-21T20:38:31+5:302020-03-21T20:41:27+5:30
पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पाहून विटांना ठेचून हत्या केल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात शुक्रवारी रात्री एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेचा मृतदेह शेतात नग्न अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. बलात्कारानंतर हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहेः
अग्रवाल मंडी टटीरी परिसरातील कुटुंब बागू येथे असलेल्या वीटभट्टीवर काम करते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपला मुलगा, सून व मुलीला घेऊन पीडितेच्या पती भट्टीतून घरी निघाला होता. त्याच्या पत्नीने थोड्या वेळानंतर घरी येण्यास सांगितले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी पोहोचली नाही. म्हणून कुटुंबीयांनी भट्टीपर्यंत पोहोचून तिचा शोध घेतला. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह टटीरी बागू मार्गावर असलेल्या शेतात आढळला. अंगावर कपडे नव्हते. विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडला होता.
टटीरी चौकी प्रभारी आणि तत्कालीन एएसपी अनिल कुमार सिंह, सीओ ओमपाल सिंग, निरीक्षक अरविंद कुमार घटनास्थळी दाखल झाले. तपासणीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, मृतदेह पाहून विटांना ठेचून हत्या केल्याचे दिसत आहे. ज्या पद्धतीने कपडे शरीरावर नसून नग्न अवस्थेत मृतदेह आहे. त्यामुळे बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवालात याबाबत स्पष्ट होईल. व्यसनी लोक, गर्दुल्ले या मार्गावर फिरतात, त्यांनी कदाचित ही हत्या केली असावी. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची अवस्था अस्थावस्त झाली आहे.
जवळच्या शेतात रक्ताचे डाग सापडले
इतर ठिकाणी हत्या करून मृतदेह येथे टाकण्यात आल्याची शक्यता पोलिसांना आहे. जवळच असलेल्या शेतात रक्ताचे काही डाग सापडले आहेत. तेथून मृतदेह इथे फेकला गेला आहे असे दिसते अशी माहिती पोलिसांनी दिली.