खळबळजनक! "पप्पांनी मम्मीला मारलं अन्..."; ४ वर्षांच्या लेकीने चित्र काढून हत्येचं रहस्य उलगडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:47 IST2025-02-18T10:46:32+5:302025-02-18T10:47:06+5:30

झाशी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षांच्या मुलीने तिच्या आईच्या हत्येचा खुलासा केला आहे.

wife sonali budholia murder revealed 4 year old daughter made drawing of sandeep | खळबळजनक! "पप्पांनी मम्मीला मारलं अन्..."; ४ वर्षांच्या लेकीने चित्र काढून हत्येचं रहस्य उलगडलं

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४ वर्षांच्या मुलीने तिच्या आईच्या हत्येचा खुलासा केला आहे. झाशीच्या कोतवाली परिसरातील पंचवटी शिव परिवार कॉलनीत राहणाऱ्या २७ वर्षीय सोनाली बुधौलियाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सोनालीचा पती संदीप बुधौलियाने याला आत्महत्या म्हटलं होतं, पण त्याच्या ४ वर्षांच्या मुलीने जे सांगितलं त्याने पोलिसांनाही धक्का बसला.

मुलीने एका कागदावर चित्र काढलं आणि वडिलांनी तिच्या आईला कसं मारलं ते सांगितलं. तसेच त्यांनी तिला मारून लटकवल्याचं म्हटलं. जेव्हा सोनालीचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या पालकांनी तिच्या पती आणि सासरच्यांवर तिची हत्या करून तिला लटकवल्याचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

सोनालीची ४ वर्षांची मुलगी दृश्यताने नेमकं काय घडलं सांगितलं. तिने कागदावर चित्र काढलं तेव्हा पोलिसांना आश्चर्य वाटलं. यामध्ये तिची आई फासावर लटकत होती पण फासाच्या जवळ दुसरा हात होता. जेव्हा पोलिसांनी विचारलं - बेटा, हा हात कोणाचा आहे, तेव्हा मुलीने उत्तर दिलं - पप्पांचा. पप्पांनी आधी मम्मीला मारलं आणि नंतर तिला लटकवलं. मुलीने हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सोनालीचा पती संदीप बुधौलियाला अटक करण्यात आली आहे. मात्र, चौकशीदरम्यान आरोपीने असा दावा केला की, दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि त्यामुळे सोनालीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोनालीच्या वडिलांनी सांगितलं की, २०१९ मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या दिवशीच त्यांनी २० लाख रुपये दिले आणि अंगठी दिली. सोनालीच्या सासरच्यांनी लग्नादरम्यानच वाद निर्माण केला होता. यानंतर त्यांनी कार मागायला सुरुवात केली. यासाठी सासरचे लोक नेहमी तिला मारहाण करायचे. आम्ही याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. 
 

Web Title: wife sonali budholia murder revealed 4 year old daughter made drawing of sandeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.