अरे देवा! iPad चार्जरसाठी पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, चाकूने केले सपासप वार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 03:59 PM2021-02-17T15:59:24+5:302021-02-17T16:00:36+5:30
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही नातेवाईक म्हणाले की, रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनचं हे चौथं लग्न होतं. याआधी त्यांनी तीन लग्ने केली होती.
ब्रिटनमध्ये एका रिटायर्ड चार्टर्ड अकाऊंटंट(CA) महिलेने तिच्या चौथ्या पतीची एका आयपॅड चार्जरसाठी चाकूने भोसकून हत्या केली. ६५ वर्षीय रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनवर आरोप आहे की, तिने वेस्टन-सुपर-मारेजवळ बॅरो गावात ७८ वर्षीय डेविड जॅक्सनची हत्या केली. पेनेलोप जॅक्सनचा जावई जेरेमी मुलिंस म्हणाला की, या घटनेवेळी दाम्पत्य किचनमध्ये होतं. सोबतच त्याने दावा केला की, एका आयपॅड फोन चार्जरवरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं होतं.
हत्येचं खरं कारण काय?
पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, माजी वरिष्ठ अधिकारी आणि एका स्थानिक गोल्फ क्लबचे कॅप्टन डेविड जॅक्सन यांचा मृत्यू चाकूने केलेल्या अनेक वारांमुळे झाला आहे. त्यांच्या बहिणीने सांगितले की, पती-पत्नीमध्ये कोणतंही भांडण झालं नाही. दोघेही एकमेकांचा सन्मान करत होते. ती म्हणाला की, दोघांमध्ये पैसे किंवा प्रॉपर्टीबाबत काहीही वाद नव्हता. दोघेही पैसेवाले होते आणि आनंदी जीवन जगत होते. त्यामुळे हत्येचं कारण समजू शकत नाहीये. (हे पण वाचा : धक्कादायक! आधी गर्भवती पत्नीसोबत काढला सेल्फी नंतर १ हजार फूट उंचीवरून दिला धक्का, वाचा कारण....)
३ लग्ने आधी केली होती
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, काही नातेवाईक म्हणाले की, रिटायर्ड सीए पेनेलोप जॅक्सनचं हे चौथं लग्न होतं. याआधी त्यांनी तीन लग्ने केली होती. आधीच्या लग्नातून एक मुलगी आणि इतर मुलांसोबत डेविड आणि पेनेलोपच्या लग्नाला २५ वर्षे झाली होती. पोलीस अधिकारी म्हणाले की, 'सध्या तपास फार प्राथमिक टप्प्यात आहे. पण लवकरच प्रकरणाचा खुलासा होईल.