गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरुन केली हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:10 PM2021-01-29T15:10:36+5:302021-01-29T15:10:47+5:30

शिवकुमार सरजू यादव असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याचा कोळसे विक्रीचा व्यवसाय आहे.

Wife strangled for not coming to village; The husband surrendered himself to the police | गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरुन केली हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन

गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरुन केली हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन

Next

डोंबिवली: गावाला यायला नकार दिला म्हणून झालेल्या वादात पत्नीची पतीने सुरीने गळा चिरून हत्या केल्याची घटना पुर्वेकडील शेलार नाका परिसरात शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली. पत्नीच्या हत्येची माहीती स्वत:हून पोलीसांना देत पती त्यांच्या स्वाधीन झाला. त्याच्याविरोधात टिळकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

शिवकुमार सरजू यादव असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याचा कोळसे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला पत्नीला मनिषा हिला गावाला घेऊन जायचे होते परंतू तीने गावाला यायला नकार दिला. यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या झालेल्या वादात घरातील सुरी घेऊन त्याने तिच्या गळयावर वार केला. रक्ताच्या थारोळयात खाली कोसळलेल्या मनिषाचा जागीच मृत्यू झाला.

विशेष बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा त्यांचा लहान मुलगा सुदर्शन घरीच होता. दरम्यान पत्नीचा खून केल्यानंतर शिवकुमारने स्वत:हून टिळकनगर पोलीस ठाण्यात फोन करून पत्नीची हत्या केल्याची माहीती दिली. या फोन नंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शिवकुमारला ताब्यात घेतले.

Web Title: Wife strangled for not coming to village; The husband surrendered himself to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.