पत्नी बोलत नाही म्हणून पाठलाग करत केली हत्या; चेंबूर येथे भररस्त्यात चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:05 AM2021-11-12T07:05:48+5:302021-11-12T07:05:58+5:30

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता.

The wife was chased and murdered for not speaking; Knife attack at Chembur | पत्नी बोलत नाही म्हणून पाठलाग करत केली हत्या; चेंबूर येथे भररस्त्यात चाकूहल्ला

पत्नी बोलत नाही म्हणून पाठलाग करत केली हत्या; चेंबूर येथे भररस्त्यात चाकूहल्ला

Next

मुंबई: पत्नी बोलत नाही म्हणून पतीने तिचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना चेंबूर येथे घडली. यात पत्नीचा मृत्यू झाला असून आरसीएफ पोलिसांनी पतीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अक्षय आठवले असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आकांक्षा (वय २१) असे मृत पत्नीचे नाव आहे.

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर  काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता. याच रागात गेल्या काही महिन्यांपासून तीआपल्या घरी वेगळी राहू लागली. अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; पण ती त्याच्याशी बोलत नव्हती.
बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने कामाला निघाली. दुचाकीवरून आलेल्या अक्षयने राहुलनगर येथे तिची रिक्षा अडवून पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने त्याने आपल्याकडील चाकूने तिच्यावर वार केले.

या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वी ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.याप्रकरणी आरोपी अक्षय याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे आरसीएफ पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी सांगितले.
 

Web Title: The wife was chased and murdered for not speaking; Knife attack at Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू