रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:22 PM2021-05-31T21:22:06+5:302021-05-31T21:38:23+5:30
Attacked on Husband : फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती.
गोरखपूर - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. शेजाऱ्यास एका युवकाच्या पत्नीसोब फोनवर बोलू नको सांगितल्याने शेजाऱ्याने त्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात युवक रक्तबंबाळ झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आल्यावर कुटुंबातील सदस्य यांनी मिळून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या युवकाची प्रकृती गंभीर आहे.
गोरखपूरच्या बड़हलगंज भागातील सकराखोर गावात राहणारा श्रीकृष्ण रविवारी रात्री उशिरा घरी पोहोचला तेव्हा पत्नी फोनवर व्यस्त होती. फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती. यानंतर श्रीकृष्णाने शेजाऱ्याला आपल्या पत्नीशी बोलण्यास मनाई केली, मग संतप्त शेजाऱ्याने श्रीकृष्णावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ज्यामुळे त्याचा रक्तस्त्राव खूप झाला.
कोरोनावर मात करून घरी जात असलेल्या महिलेला रस्त्यात गाठून केला बलात्कार https://t.co/WwlH1iomlx
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईने जखमीस सीएचसी बड़हलगंज येथे आणले, पण प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर गोरखपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. या युवकाची प्रकृती येथे गंभीर आहे. दुसरीकडे, या प्रकरणात बड़हलगंज एसओने पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.