अशीही फसवणूक! पत्नी लाखो रूपये घेऊन परदेशात गेली, पतीचा फोन उचलणंही केलं बंद...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:00 PM2021-09-20T14:00:55+5:302021-09-20T14:01:25+5:30
पीडित पतीचं नाव मनवीर सिंह मंड आहे. लोहतबड्डी गावात राहणाऱ्या मंडने २०१९ मध्ये लालटन कला गावातील गुरकमल कौरसोबत लग्न केलं होतं.
पंजाबमध्ये एका व्यक्तीला त्याच्याच पत्नीने कथितपणे फसवलं आणि त्याचे पैसे घेऊन परदेशात गेली. ती पतीसोबत देशाबाहेर सेटल होण्याचा प्लॅन करत होती. पण पत्नीने परदेशात पोहोचल्यावर आपल्या पतीला फोन करणं किंवा त्याच्या फोनला उत्तर देणंच बंद केलं. तेव्हा पतीला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली. रिपोर्टनुसार, या व्यक्तीला त्याच्या पत्नीने आणि सासरच्या लोकांना भडकवलं होतं.
पीडित पतीचं नाव मनवीर सिंह मंड आहे. लोहतबड्डी गावात राहणाऱ्या मंडने २०१९ मध्ये लालटन कला गावातील गुरकमल कौरसोबत लग्न केलं होतं. त्याच्या सासरचे परमजीत सिंह आणि सुरिंदर कौर व पुष्पिंदर सिंह यांनी पीडित व्यक्तीला फसवलं. (हे पण वाचा : खुलासा! डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनरमध्ये काय होतं नातं? ११०० झालं होतं बोलणं...)
मंड याने सांगितलं की त्याने त्याच्या पत्नीच्या व्हिसासाठी भरपूर पैसा खर्च केला होता. गुरकमलची कॉलेज फी, लॅपटॉप आणि विमानाचं तिकीटही त्याने घेऊन दिलं होतं. मात्र, जशी गुरकमल परदेशात पोहोचली तिने मंड याचा फोन उचलणंच बंद केलं.
हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, पत्नीने फोन उचलणं बंद केल्यावर हैराण झालेल्या मंडने आपल्या परिवाराला संपर्क केला आणि सासरच्या लोकांकडून पैसे परत मागण्यास सांगितलं. पण आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मंड याने एक सप्टेंबरला पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिली.
नंतर दोन्ही पक्षात वाद सोडवण्यात आला आणि आरोपी पीडित व्यक्तीला १५ लाख रूपये देण्यास तयार झाले. मात्र, आरोपींनी केवळ ७ लाख रूपये परत दिले. त्यामुळे मंडने त्यांच्या विरोधात आणखी एक नवीन तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील कारवाई सुरू आहे.