महिला बॉससोबत पत्नीची वाढत होती जवळीकता, वैतागून पतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:56 AM2021-10-20T11:56:53+5:302021-10-20T11:57:21+5:30

लखनौमध्ये टाइपरायटर बाबा नावाने प्रसिद्ध गोमती नगरच्या विराम खंड भागात राहणारा कृष्ण कुमारचा मुगा निखिलने आत्महत्या केली.

UP : Wife woman boss relationship husband suicide in Lucknow | महिला बॉससोबत पत्नीची वाढत होती जवळीकता, वैतागून पतीने केली आत्महत्या

महिला बॉससोबत पत्नीची वाढत होती जवळीकता, वैतागून पतीने केली आत्महत्या

Next

लखनौमध्ये पत्नीची महिला बॉससोबत वाढत असलेल्या जवळीकतेला वैतागून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणीने इन्स्पेक्टर, एसपी आणि पोलीस कमिश्नर यांना सुसाइड नोट लिहून आत्महत्येला पत्नीसोबत तिच्या महिला बॉसची वाढती जवळीकता जबाबदार असल्याचं सांगितलं. सध्या पोलिसांनी ३ लोकांना आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली.

लखनौमध्ये टाइपरायटर बाबा नावाने प्रसिद्ध गोमती नगरच्या विराम खंड भागात राहणारा कृष्ण कुमारचा मुलगा निखिलने आत्महत्या केली. पत्नीची तिच्या महिला बॉससोबत वाढत असलेल्या जवळीकतेमुळे आत्महत्या केली. असं सांगितलं जात आहे की, निखिलने इन्स्पेक्टर गोमती नगर, एसीपी गोमती नगर आणि पोलीस कमिश्नरच्या नावाने ३ वेगवेगळे सुसाइड नोट लिहिले होते.

तीन सुसाइडमध्ये मृत निखिलने लिहिले की, त्याची पत्नी अंजू गुप्ता जेव्हापासून अहमामउ कल्याणी ग्रुपच्या ऑफिसमध्ये काम करू लागली, तेव्हापासून त्यांच्या नात्यात फरक पडला. कंपनीचे मॅनेजर महिपाल आणि त्याची पत्नी शशि किरणच्या संपर्कात आल्यावर त्याची पत्नी अंजू गुप्ता ७ वर्षाची मुलगी वैष्णवीला घेऊन आपल्या महिला बॉससोबत राहण्याचा हट्ट करत होती. जर तिचं ऐकलं नाही तर अंजू विष खाऊन आत्महत्येची धमकी देत होती.

याच गोष्टीला कंटाळून निखिलने गोमती नगर घरातील पहिल्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.  तेच घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी त्याची पत्नी अंजू, महिला बॉस शशि किरण आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.
 

Web Title: UP : Wife woman boss relationship husband suicide in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.