पत्नीची मृत्यूशी झुंज; चारित्र्याच्या संशयातून पतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 05:55 PM2020-02-15T17:55:33+5:302020-02-15T17:58:15+5:30
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर - चरित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या पतीने २८ जानेवारीला रागात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पीडित महिला शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी पती मनोजकुमार याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शहरातील शांतीनगर गोबाईपाडा परिसरात राहणाऱ्या मनोजकुमार व पत्नीत चरित्रावर संशयावरून भांडणे होत होती. २८ जानेवारी रोजी मनोजकुमार याने पत्नीच्या चरित्रावर संशय घेत, पत्नीकडील मोबाईलची चौकशी सुरू केली. यावेळी दोघात कडाक्याचे भांडण होऊन, रागाच्या भरात मनोजकुमार याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले.
४५ ते ५० टक्के जळलेली महिलेवर प्रथम मध्यवर्ती तर नंतर मुंबईतील जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान शुद्धीवर आलेल्या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी पतीविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिला मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी महिलेच्या पाटील अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक.एम.डी.राळेभात करीत आहेत.