पत्नीचा प्रियकर समजून पतीने पाठविले पत्नीचे अर्धनग्न फोटो; मंत्रालयातील कर्मचाऱ्यासोबत घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 03:40 IST2018-10-07T03:38:44+5:302018-10-07T03:40:10+5:30
मुंबई ते सातारा बस प्रवासादरम्यान महिलेसोबत ओळख झाली. ओळखीत मोबाइल क्रमांक शेअर केला. त्यानंतर, थेट ५ वर्षांनी महिलेच्या पतीने फोन करून, पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला

पत्नीचा प्रियकर समजून पतीने पाठविले पत्नीचे अर्धनग्न फोटो; मंत्रालयातील कर्मचाऱ्यासोबत घडला प्रकार
मुंबई : मुंबई ते सातारा बस प्रवासादरम्यान महिलेसोबत ओळख झाली. ओळखीत मोबाइल क्रमांक शेअर केला. त्यानंतर, थेट ५ वर्षांनी महिलेच्या पतीने फोन करून, पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला आणि त्याला पत्नीसोबतच्या संभोगाच्या व्हिडीओसह अर्धनग्न फोटो पाठविल्याचा अजब प्रकार मंत्रालयातील कर्मचाºयासोबत घडला. सहा महिने महिलेच्या पतीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून कर्मचाºयाने पोलिसांत धाव घेतली. सध्या भांडुप पोलीस या अजब गुन्ह्याचा तपास करत आहेत.
मूळचा साताºयाचा रहिवासी असलेला २६ वर्षीय रमेश (नावात बदल) कुटुंबीयांसोबत खिंडीपाडा परिसरात राहतो. तो मंत्रालयातील वनविभागात नोकरीला आहे. पाच वर्षांपूर्वी मुंबई ते सातारा टुर्स बसने जाताना त्याची वैशाली नामक महिलेशी ओळख झाली. महिलेच्या मागणीनुसार त्याने तिला त्याचा मोबाइल क्रमांक दिला. मात्र, त्यानंतर तिने कधीच त्याच्याशी संपर्क साधला नाही.
अचानक गेल्या सहा महिन्यांपासून रमेशला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला कॉल करून, वैशालीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला. रमेशने त्याला काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगून फोन कट केला. मात्र, त्यानंतर तो वारंवार फोन करून रमेशला त्रास देऊ लागला. त्याने फोन घेणे बंद केले. त्याने व्हॉट्सअॅपवरून त्याला संदेश पाठविण्यास सुरुवात केली. अशात त्याने वैशालीसोबतच्या शारीरिक संभोगाचे व्हिडीओ आणि वैशालीचे अर्धनग्न फोटो पाठविले.
या प्रकारामुळे तो गोंधळला. त्याने व्हिडीओ, फोटो डीलीट केले. २ आॅक्टोबरलाही त्याने वैशालीचे अर्धनग्न फोटो पाठविले. त्यांनी मोबाइल क्रमांक ब्लॉक करताच, तो अन्य क्रमांकावरून फोन, मेसेज पाठवित असे. अखेर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, रमेशने भांडुप पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सहा महिन्यांपासून येत होते फोन
- अचानक गेल्या सहा महिन्यांपासून रमेशला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन येऊ लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला कॉल करून, वैशालीसोबत अनैतिक संबंध आहेत का, असा सवाल केला. रमेशने त्याला काहीतरी गैरसमज झाल्याचे सांगून फोन कट केला होता़