लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव उघड झालं; ऐकून पतीला जबर धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:15 PM2022-09-23T13:15:35+5:302022-09-23T13:16:48+5:30

१२ वर्षापूर्वी पूजानं जगवीरशी लग्न केले होते. या दोघांना आयुष आणि शगुन अशी दोन मुले आहेत.

Wife's real name revealed after 12 years of marriage; The husband was shocked to hear | लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव उघड झालं; ऐकून पतीला जबर धक्काच बसला

लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव उघड झालं; ऐकून पतीला जबर धक्काच बसला

googlenewsNext

अयोध्या - लग्नाच्या १२ वर्षानंतर पत्नीचं खरं नाव समजल्यानंतर पतीला धक्का बसला. पत्नीचं नाव समोर येताच आता पतीला इस्लाम कबूल करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर इस्लाम कबूल केला नाही तर शिरच्छेद करू अशी धमकी पतीला देण्यात आली आहे. पतीनं याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. 

१२ वर्षापूर्वी पूजानं जगवीरशी लग्न केले होते. या दोघांना आयुष आणि शगुन अशी दोन मुले आहेत. लग्नाच्या १२ वर्षांनी आता पूजा ही पूजा नसून ती हसीना बानो असल्याचा धक्कादायक खुलासा पतीसमोर झाला. इतकेच नाही तर २ वर्षापूर्वी जेव्हा मुलाचं शाळेत नाव नोंदवण्यात आले तेव्हा पूजा उर्फ हसीना बानोने मुलगा आयुषचं नाव अनील असं लिहिल्याचंही उघड झाले. आयुषचं संधी साधून खतनाही करण्यात आले. आता जगवीरनं या सर्व गोष्टींना विरोध केला असता त्याला इस्लाम धर्म स्वीकार अन्यथा शिरच्छेद करू अशा धमक्या येऊ लागल्या आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला परंतु जीवाच्या भीतीपोटी आता जगवीरनं संत-महंतांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.  

नेमका काय आहे प्रकार? 
जगवीर यांचे दाजी रामजन्म कोरी यांना १२ वर्षापूर्वी फैजाबाद रेल्वे स्टेशनबाहेर एक युवती भेटली. तिने तिचं नाव पूजा सांगितले आणि घरात कुणीही नसल्याचं बोलली. रामजन्म कोरी यांनी या मुलीचं लग्न जगवीरसोबत लावून दिले. सुरुवातीला कोर्ट मॅरेज केल्यानंतर जगवीर आणि युवतीने हिंदु पद्धतीने विवाह केला. यात मुलीकडून कुणीही सहभागी झालं नव्हतं कारण तिला कुटुंब नव्हतं. लग्नाच्या काही महिन्यांनी आयुषचा जन्म होता जो सध्या १० वर्षाचा आहे. त्यानंतर शगुन नावाची कन्याही जन्माला येते. 

एकेदिवशी पत्नी पूजा मुलांसह नमाज पठण करताना जगवीरला दिसली तेव्हा तिच्यावर संशय आला. जगवीर आणि पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर पत्नी प्रतापगडला माहेर असल्याचं सांगत निघून गेली. काही काळाने पत्नी परतली तेव्हा आयुषचं खतना केल्याचंही उघड झाले. त्यानंतर हसीना बानोचे आई वडील स्थानिक दबंग राजू उर्फ नसीर जगवीरच्या घरी पोहचून त्याला मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. जर मुस्लीम धर्म स्वीकारला नाही तर शिरच्छेद करू अशी धमकी देण्यात आली. सध्या जगवीरच्या आरोपांवरून पोलिसांनी नसीरला अटक केली आहे. 

Web Title: Wife's real name revealed after 12 years of marriage; The husband was shocked to hear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.